दुबई मोहल्यातील सद्दामकडून गांजा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By प्रदीप भाकरे | Published: March 23, 2024 06:02 PM2024-03-23T18:02:55+5:302024-03-23T18:03:14+5:30
ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धारणी शहरातील दोन ठिकाणांहून सुमारे १० किलो गांजा जप्त केला.
अमरावती: ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धारणी शहरातील दोन ठिकाणांहून सुमारे १० किलो गांजा जप्त केला. २२ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली. शेख तस्लीम शेख उस्मान (रा. दुबई मोहल्ला, धारणी) व राजु टिकाराम हरसुले (रा. टिंगऱ्या रोड, धारणी) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे धारणी ठाण्याच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असतांना शेख तस्लीम व राजु हरसुले हे राहत्या घरी अवैधरित्या गांजाची विक्री करीत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार, राजु हरसुले याच्या घरातून ३३ हजार ७९० रुपये किमतीचा ६ किलो ७५८ ग्रॅम तसेच सद्दामच्या घरातून १६ हजार ३०० रुपयांचा ३ किलो २६० ग्रॅम गांजा मिळून आला. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूध्द धारणी पोलीस ठाण्यात एनडीपीएसअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्निल तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, वृषाली वाळसे, चालक निलेश येते यांनी ही कारवाई केली.