कामगारांच्या हाकेला धावणारा जवाहर सहकारी सूतगिरणीचा गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:11 AM2021-09-13T04:11:53+5:302021-09-13T04:11:53+5:30

दहा दिवस उत्सव, अधिकारी-कर्मचारी होतात सहभागी मोहन राऊत/धामणगाव रेल्वे : दहा दिवस येता- जाता नतमस्तक होऊन ज्याची आराधना ...

Ganpati of Jawahar Sahakari spinning mill running for the workers | कामगारांच्या हाकेला धावणारा जवाहर सहकारी सूतगिरणीचा गणपती

कामगारांच्या हाकेला धावणारा जवाहर सहकारी सूतगिरणीचा गणपती

googlenewsNext

दहा दिवस उत्सव, अधिकारी-कर्मचारी होतात सहभागी

मोहन राऊत/धामणगाव रेल्वे : दहा दिवस येता- जाता नतमस्तक होऊन ज्याची आराधना केली जाते, तो कामगारांच्या हाकेला पावणारा लंबोदर म्हणून येथील जवाहर सहकारी सूतगिरणीतील गणपतीची ओळख आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या मुलांचे पुनर्वसन व बेरोजगारांना आधार देण्यासाठी स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या नावाने असलेली जळगाव आर्वी एमआयडीसी परिसरातील जवाहर सहकारी सूतगिरणी. माजी खासदार दत्ता मेघे यांच्या मार्गदर्शनात पाच वर्षांपूर्वी या सूतगिरणीची धुरा अध्यक्ष सागर मेघे व उपाध्यक्ष विजय उगले यांनी आपल्या हाती घेतली. आज ही सूतगिरणी पाच तालुक्यांमधील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्य, सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू मुले, मुली तसेच दीड हजार बेरोजगारांसाठी आधारवड बनली आहे.

सूतगिरणीचे उपाध्यक्ष विजय उगले यांच्या संकल्पनेतून येथे गणेशोत्सवाला सुरुवात झाली. तेव्हापासून हा गणेश उत्सव अखंडित सुरू आहे. गणपती स्थापनेला प्रत्येक कामगार येथे आपली हजेरी लावतो. दररोज ड्युटीवर येताना व घरी जाताना या गणपतीला प्रत्येक जण नतमस्तक होतो. बाप्पाची मूर्तीही अगदी विलोभनीय व पाहताक्षणीच कोणालाही प्रसन्न वाटेल, अशीच दरवर्षी असते. या उत्सवात अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही तेवढाच सहभाग असतो. दरवेळी सर्वांना विसर्जनाच्या पहिल्या दिवशी महाप्रसाद म्हणून भोजनाचा कार्यक्रम असतो. मात्र, दोन वर्षांपासून कोरोनामुळे प्रत्येक कामगाराच्या घरी बुंदी व शेव प्रसादरुपात दिला जातो. गणेशोत्सवादरम्यान स्वतः वर्गणीत प्रत्येक अधिकारी, कर्मचारी व कामगार मोलाचा वाटा देतात. कामगारांच्या हाकेला धावणारा गणपती म्हणून आज त्याची ओळख आहे.

Web Title: Ganpati of Jawahar Sahakari spinning mill running for the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.