ग्रंथदिंडीने दुमदुमली अंबानगरी

By admin | Published: February 28, 2017 12:11 AM2017-02-28T00:11:53+5:302017-02-28T00:11:53+5:30

ढोल, ताशांचा गजर.. लेझिम पथक... टाळ मृदंग.. नऊवारी पेहरावातील विद्यार्र्थिंनी.. भगवे फेटे.. भजनी मंडळ.. अस्सल मराठी संस्कृती.. अन् मराठमोळ्या वातावरणात ...

Ganthadindi Dumdumli Ambanagari | ग्रंथदिंडीने दुमदुमली अंबानगरी

ग्रंथदिंडीने दुमदुमली अंबानगरी

Next

मराठी भाषा दिवस साजरा : नेहरू मैदान ते सांस्कृतिक भवनदरम्यान गजर
अमरावती : ढोल, ताशांचा गजर.. लेझिम पथक... टाळ मृदंग.. नऊवारी पेहरावातील विद्यार्र्थिंनी.. भगवे फेटे.. भजनी मंडळ.. अस्सल मराठी संस्कृती.. अन् मराठमोळ्या वातावरणात सोमवारी निघालेल्या गं्रथ दिंडीने अंबानगरी दुमदुमून गेली.
ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस सोमवारी मराठी भाषा दिन म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून स्थानिक नेहरु मैदान ते संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनदरम्यान गं्रथ दिंडी काढण्यात आली. गं्रथ दिंडीला कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आले. यावेळी कुलसचिव अजय देशमुख, बीसीयूडीचे संचालक राजेश जयपूरकर, मराठी विभाग प्रमुख मनोज तायडे, परीक्षा विभाग नियंत्रक जयंत वडते, लेखा व वित्त अधिकारी शशीकांत अस्वले, श्रीकांत पाटील, गणेश मालटे, अविनाश असनारे, कार्यकारी अभियंता शशीकांत रोडे, जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर, विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय देशमुख, मोना चिमोटे, हेमंत खडके आदी उपस्थित होते. गं्रंथ दिंडीत मराठी भाषेचे गं्रथ ठेवण्यात आले होते. महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गं्रथ दिंडीची सजावट केली होती. गं्रथ दिंडीत राष्ट्रीय सेवा योजना, विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. गं्रथ दिंडी ही नेहरु मैदानाहून पुढे रेल्वे स्टेशन चौक, ईर्विन चौकातून पुढे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात समारोप करण्यात आला. दिंडीत मराठमोळ्या गीतांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांनी धमाल केली. शेवटी ढोल ताशांच्या गजर होताच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकांनी बेधूंद होऊन ताल धरला. काही विद्यार्थ्यांच्या हातात राष्ट्रध्वज लक्ष वेधून घेत होते. एकापेक्षा एक सरस मराठी गीतांवर मुला- मुलींनी ताल धरताना माय मराठी भाषेला सलाम ठोकला.

Web Title: Ganthadindi Dumdumli Ambanagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.