नाल्यांवर गार्बेज अरेस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 01:26 AM2019-06-23T01:26:27+5:302019-06-23T01:27:31+5:30

पावसाळ्यात कचरा व प्लास्टिकमुळे अंबानाला बुजून वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना दरवर्षी घडतात. याला पायबंद बसावा अन् नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना कुठलाही धोका होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाद्वारा यंदा लहान नाल्यांमधील कचरा व पाणी अंबा नाल्यात शिरण्यापूर्वीच तीन ठिकाणी लोखंडी कठड्यांद्वारे (गार्बेज अरेस्टर) अटकाव केला जाणार आहे.

Garbage Arrestor on the Nallah | नाल्यांवर गार्बेज अरेस्टर

नाल्यांवर गार्बेज अरेस्टर

Next
ठळक मुद्देतीन ठिकाणी लोखंडी कठडे । पुराचे पाणी वस्त्यांमध्ये शिरू नये यासाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पावसाळ्यात कचरा व प्लास्टिकमुळे अंबानाला बुजून वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना दरवर्षी घडतात. याला पायबंद बसावा अन् नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना कुठलाही धोका होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाद्वारा यंदा लहान नाल्यांमधील कचरा व पाणी अंबा नाल्यात शिरण्यापूर्वीच तीन ठिकाणी लोखंडी कठड्यांद्वारे (गार्बेज अरेस्टर) अटकाव केला जाणार आहे. अंबानाला कचरामुक्त करण्यासाठी प्रशासनाची मान्सनूपूर्व लगबग सुरू आहे.
शहराच्या मध्यवस्तीतून वाहणाऱ्या अंबानाल्याला अनेक लहान नाले मिळतात. यापैकी प्रमुख तीन नाल्यांवर यंदा कचरा व प्लास्टिकचा अटकाव करण्यासाठी लोखंडी कठडे लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये काँग्रेसनगर व फ्रेझरपुरादरम्यान एक गार्बेज अरेस्टर याच आठवड्यात लावले. नागपूर मार्गावरील तारासाहेब बगिच्याजवळ व चुनाभट्टी परिसरात असे तीन ठिकाणी नाल्यातील कचरा व प्लास्टिकला अटकाव केला जाईल. पुरामुळे तेथे कचरा अडकल्यानंतर दुसºया दिवशी महापालिकेच्या आरोग्य विभागाद्वारा तो काढला जाणार आहे. या लहान नाल्यांचे पाणी अंबानाल्यात पोहोचण्यापूर्वी कचरा निघणार असल्याने काठालगतच्या नागरिकांच्या घरात पुराचे पाणी शिरण्याचा धोका टळणार असल्याची माहिती उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी दिली.
महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या निधीतून ही कामे होत आहे. लोखंडी तीन गार्बेज अरेस्टरसाठी फारतर तीन, साडेतीन लाखांचा निधी खर्च होणार आहे. परंतु यामुळे कित्येक टन प्लास्टिकला अटकाव होऊन अंबानाला कचऱ्याने बुजून पूर येणे व नंतर काठालगतच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरणे आदी संभाव्य धोका टळणार आहे. कचऱ्यामुळे नाल्यांचा प्रवाह थांबल्यास होणारी डासांची उत्पत्ती, घाण व त्यामुळे होणारी दर्गंधी यामुळे काही प्रमाणात कमी होणार आहे.
तीनही वेगळ्या प्रकारचे गार्बेज अरेस्टर
अंबानाल्यात पाणी शिरण्यापूर्वी लहान नाल्यांवर काँग्रेसनगर ते फ्रेझरपुऱ्याच्या मधात लोखंडी कठड्याचे गार्बेज अरेस्टर या आठवड्यात लावण्यात आले. नागपूर मार्गावरील तारासाहेब बगिच्याजवळील गार्बेज अरेस्टरला नाल्यात लोंखडी जाळी लावण्यात येणार आहे, तर चुनाभट्टी परिसरातील नाल्यावरील गार्बेज अरेस्टरला टेनिसची नेट लावण्यात येणार आहे. यामुळे लहान आकाराचा कचरा व प्लास्टिकला जागेवरच अटकाव होणार आहे.

यंदा अंबानाल्याला मिळणाऱ्या तीन नाल्यांवर तीन ठिकाणी गार्बेज अरेस्टर बसविण्यात येत आहे. यामुळे अंबानाल्यात कचरा वाहून जाण्यापूर्वीच त्याला अटकाव होऊन संभाव्य धोके टळणार आहे.
- सुहास चव्हाण,
कार्यकारी अभियंता, महापालिका

Web Title: Garbage Arrestor on the Nallah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.