तरोडा धानोऱ्यात कचऱ्याचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:16 AM2021-08-12T04:16:43+5:302021-08-12T04:16:43+5:30
तरोडा येथे सार्वजनिक विहीर परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसात गाजर गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जागोजागी ...
तरोडा येथे सार्वजनिक विहीर परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसात गाजर गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग पडले आहेत. त्यामुळे विविध किटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने गावातील नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. अनेक रुग्ण डेंगूच्या बिमारीशी झुंज देत आहे. तरी ग्रामपंचायत मार्फत संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी, गावातील स्ट्रीट लाईट, नाला खोलीकरण, नाल्यांची साफसफाई, गावातील अंतर्गत रस्ते, सार्वजनिक विहिरीजवळ असलेली घाण, गाजर गवत कापून तेथील परिसर स्वच्छ करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. तानाजी युवा बहुउद्देशीय संस्थेचे शाखाध्यक्ष संजय तुमडाम, उपाध्यक्ष लीलाधर धुर्वे, सचिव अक्षय धुर्वे, कमलेश उईके, योगेश धुर्वे, मंगेश पंधरे, विकास सलामे, निलेश वानखडे, सुशील भलावी, स्वप्निल पांडे, जीवन वर्मा, आकाश धुर्वे, गजानन धुर्वे, कपिल युनाते याप्रसंगी उपस्थित होते.
-----------------------