गॅस सिलिंडरचा तुटवडा; आॅनलाईन नंबर लावूनही मिळेना

By admin | Published: February 16, 2017 12:01 AM2017-02-16T00:01:39+5:302017-02-16T00:01:39+5:30

आखाती देशातून गॅस आयातीत अडचणी निर्माण होत असल्याने मागील १५ दिवसांपासून ग्राहकांना सिलिंडरसाठी पायपीट करावी लागत आहे.

Gas cylinder deficit; Get an online number too | गॅस सिलिंडरचा तुटवडा; आॅनलाईन नंबर लावूनही मिळेना

गॅस सिलिंडरचा तुटवडा; आॅनलाईन नंबर लावूनही मिळेना

Next

अमरावती : आखाती देशातून गॅस आयातीत अडचणी निर्माण होत असल्याने मागील १५ दिवसांपासून ग्राहकांना सिलिंडरसाठी पायपीट करावी लागत आहे. वितरकांकडे मागणी वाढली असून गॅस कंपन्यांकडून मात्र अत्यल्प प्रमाणात पुरवठा होत आहे.
गॅस सिलिंडर संपले की गृहिणींची तारांबळ उडते. जिल्हाभरात अलिकडे नेमकी हिच स्थिती निर्माण झाली आहे. शहरात दर महिन्याला दीड लाख गॅस सिलिंडर्सची मागणी आहे. त्यातुलनेत गॅस कंपन्यांकडून २५ टक्केच सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. गॅस एजन्सींकडे चार ते पाच दिवस आधी आॅनलाईन मागणी करूनही वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याची ओरड आहे. यावर्षी थंडी अधिक पडल्याने गॅसचा वापरही वाढला. परिणामी मागणीत वाढ झाली. घरगुती अथवा व्यावसायिक वापराचा गॅस आखाती देशातून जहाजाने बंदरावर आयात केला जातो. आखाती देशातून जहाजाद्वारे आणला जाणारा पुढे गॅस टँकरद्वारे रिफिलिंग प्लँटमध्ये येतो. त्यानंतर यागॅसवर प्रक्रिया करून त्याचे सिलिंडरमध्ये रिफिलिंग होते. मात्र, अलिकडे आखाती देशातून जहाजाने आयात होणारा जळाऊ गॅस उशिरा येत आहे. त्यामुळे रिफिलिंग प्लँटमध्ये आवक कमी झाली आहे. परिणामी सिलिंडरचा तुटवडा हल्ली पश्चिम व उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याची माहिती आहे. परंतु ज्या कुटुंबाकडे एकच सिलिंडर आहे, अशा कुटुंबांना वेळीच गॅस मिळत नसल्याने त्यांना स्टोव्ह अथवा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. महानगरातील वितरकांनी गॅस कंपन्यांकडे सिलिंडरची मागणी केली असताना त्यांना गॅस सिलिंडरचा पुरवठा होत नाही. दुसरीकडे सिलिंडरसाठी ग्राहकांची ओरड सुरु आहे. गॅसविक्रेत्यांच्या गोदामात ठणठणाट दिसून येत आहे. गॅस एजन्सी कार्यालयात सिलिंडरच्या मागणीसाठी झुंबड उडाल्याचे चित्र आहे. ऐन महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या काळात अचानक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागल्याने गृहिणींना प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागतोय. जिल्हा प्रशासनाने नियमित गॅस पुरवठ्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. सिलिंडर तुटवड्याबाबत अतिरिक्त जिल्हाधिकारी के.आर.परदेशी यांचेशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. मात्र सिलिंडरच्या टंचाईमुळे असंतोषाचा भडका उडण्यापूर्वी स्थिती हाताळणे गरजेचे असल्याचे दिसते.

तीन ते चार दिवसांत गॅस सिलिंडर वितरणाची परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. आखाती देशातून गॅसच्या आयातीत अडचणी येत असल्याने गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे.
- संजय देशमुख, वितरक, अमरावती.

चार दिवसांपूर्वी सिलिंडरची आॅनलाईन मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्यापही सिलिंडर मिळाले नाही. उद्भवलेल्या सिलिंडर तुटवड्याचा गृहिणींना प्रचंड त्रास आहे.
-प्रगती बांबोडे, गृहिणी, बिच्छू टेकडी

Web Title: Gas cylinder deficit; Get an online number too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.