गॅस सिलिंडरची २६ रुपयांनी दरवाढ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:10 AM2021-07-02T04:10:21+5:302021-07-02T04:10:21+5:30
अमरावती : एका दिवसाच्या फरकाचे गॅस सिलिंडरधाकरांना २६ रुपये मोजावे लागल्याचे ३० जून रोजी पुढे आले. त्यासाठी दरमहा १ ...
अमरावती : एका दिवसाच्या फरकाचे गॅस सिलिंडरधाकरांना २६ रुपये मोजावे लागल्याचे ३० जून रोजी पुढे आले. त्यासाठी दरमहा १ तारखेला होणाऱ्या दरवाढीचा दाखला देण्यात आला. ३० जूनला ८३४ रुपये दर असताना १ जुलैला घरी येणाऱ्या सिलिंडरसाठी ८७० रुपये मोजावे लागले. याद्वारे अमरावतीकरांना हजारो रुपयांचा फटका बसला.
अमरावतीकरांनी ३० जून रोजी ऑनलाईन सिलिंडर बूकिंग केले तेव्हा ८३४ रुपयांचा मेसेज आला. मात्र, १ जुलै रोजी सिलिंडर वितरकाने ८७० रुपयांची मागणी केली. याबाबत एजन्सीला विचारणा केली असता, दर महिन्याच्या १ तारखेला गॅस सिलिंडरचे दर कमी-जास्त होतात, असे सांगण्यात आले. ८६० रुपये झाल्याने तुमच्याकडून वितरकाने ८७० रुपये घेतले असावे, असेही स्पष्ट करण्यात आले.
-------------
शहरात २० गॅस वितरण केंद्रअमरावती शहरात २० गॅस सिलिंडर वितरण केंद्रे आहेत. तेथून दररोज हजारो सिलिंडर शहरवासीयांना पुरविले जातात. याद्वारे एका दिवसाच्या फरकाचे हजारो रुपये ग्राहकांच्या खिशातून गेले.
कोट
दरमहा १ तारखेला सिलिंडरचे दर कमी-अधिक होतात. त्यामुसार किंमत आकारली जाते. गुरुवारी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८६० रुपये झाल्याने तेवढी रक्कम ग्राहकाकडून घेण्यात आली.
- मो. हसनजी, विदर्भ गॅस एजन्सी, अमरावती