अप्पर वर्धा धरणाचा एक दरवाजा उघडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 05:00 AM2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:01:20+5:30
जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता रेश्मा देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी नलदमयंती सागरात जलपूजन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता प्रवीण सोळंके, पी.पी. पोटफोडे, माजी कार्यकारी अभियंता सतीश चव्हाण, उपविभागीय अभियंता गजानन साने व अन्य अधिकारी उपस्थित होते. ६७८.२७ दलघमी क्षमता असलेल्या या प्रकल्पात गुरुवारअखेर ६२०.५९ अर्थात ८९.९९ टक्के जलसाठा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : तालुक्यातील सिंभोरास्थित अप्पर वर्धा प्रकल्पाचा सातव्या क्रमांकाचा दरवाजा गुरुवारी ५ सेंटीमीटरने उघडण्यात आला. जिल्ह्यात सर्वात मोठा सिंचन प्रकल्प असलेल्या या प्रकल्पाची दारे केव्हा उघडणार, याची उत्सुकता लागली होती. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने एक-दोन दिवसांत दारे उघडण्याचे संकेत धरण विभागाने दिले होते. दरम्यान, गुरुवारी २३९ घनमीटर प्रतिसेकंद येवा होत असल्याने १३ पैकी सातव्या क्रमांकाचा दरवाजा उघडण्यात आला. त्यातून ८ घनमीटर प्रतिसेकंदाने पाणी विसर्ग होत आहे.
जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता रेश्मा देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी नलदमयंती सागरात जलपूजन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता प्रवीण सोळंके, पी.पी. पोटफोडे, माजी कार्यकारी अभियंता सतीश चव्हाण, उपविभागीय अभियंता गजानन साने व अन्य अधिकारी उपस्थित होते. ६७८.२७ दलघमी क्षमता असलेल्या या प्रकल्पात गुरुवारअखेर ६२०.५९ अर्थात ८९.९९ टक्के जलसाठा झाला आहे. मागील वर्षी यावेळी केवळ ४२.५७ टक्के जलसाठा होता. दरम्यान येथील स्वयंचलित यंत्र बंद पडल्याने हस्तचलित यंत्रणाने धरणाचे एक दार उघडण्यात आले. कालवा निरीक्षक दिलीप उतखेडे, अनिल भुंबरकर, मोहन बादशे, सुरेश यावले, प्रकाश शिरभाते, उमेश शिंदे हे कर्मचारी जलपूजनाच्या वेळी उपस्थित होते.