४३ ग्रामसेवकांचा आदर्श पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2016 12:04 AM2016-04-06T00:04:05+5:302016-04-06T00:04:05+5:30

ग्रामपंचायतस्तरावर उत्कृष्ट कार्य करणारे जिल्ह्यातील ४३ ग्रामसेवक आणि चार विस्तार अधिकाऱ्यांना सन २०११ ते २०१५ या चार वर्षांसाठी ...

Gaurav honored with 43 Gramsevaks Model Award | ४३ ग्रामसेवकांचा आदर्श पुरस्काराने गौरव

४३ ग्रामसेवकांचा आदर्श पुरस्काराने गौरव

Next

जिल्हा परिषद : विस्तार अधिकाऱ्यांचाही सन्मान, चार वर्षांच्या पुरस्कारांचे एकत्रित वितरण
अमरावती : ग्रामपंचायतस्तरावर उत्कृष्ट कार्य करणारे जिल्ह्यातील ४३ ग्रामसेवक आणि चार विस्तार अधिकाऱ्यांना सन २०११ ते २०१५ या चार वर्षांसाठी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागामार्र्फत डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात मंगळवारी गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष सतीश उईके होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यपालन अधिकारी सुनील पाटील, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, सरिता मकेश्वर, उपमुख्य कार्यपालन अधिकारी जे.एन आभाळे, प्रकाश तट्टे, संजय इंगळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडार, प्रमोद कापडे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी संबोधित करताना अध्यक्ष सतीश उईके म्हणालेत, ग्रामपंचायतस्तरावर विकासाची बरीच कामे करता येतात. यासाठी केवळ विकासाची दृष्टी असावी लागते. ही दृष्टी ठेवून जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सतीश हाडोळे यांनी विचार मांडताना ग्रामसेवकांवर दिवसेंदिवस वाढत चाललेला कामाचा ताण आणि अतिरिक्त जबाबदारी लक्षात घेता यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी गिरीश कराळे, मुख्य कार्यपालन अधिकारी सुनील पाटील प्रकाश तट्टे यांनीही मागदर्शन केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ, प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन ग्रामसेवकांचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक जे.एन आभाळे तर संचालन दिनेश गाडगे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन पतंगराव यांनी केले. कार्यक्रमासाठी कल्पना दाभाडे, प्रशांत धर्माळे, सुदेश तोटेवार, श्रीकांत मेश्राम, विजय कविटकर, विजया गवळी, प्रदीप बद्रे, दीपक बांबटकर, जयंत गंधे, पोहेकर, श्रीकांत सदाफळे, संजय धोटे, अरविंद सावंत यांचे सहकार्य लाभले.
पुरस्कार वितरणाला जिल्हा ग्रामसेवक युनियनचे कमलाकर वनवे, प्रमोद काळपांडे, संजय चौधरी, बबन कोल्हे, चारथळ व पदाधिकारी तसेच गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आदींची उपस्थिती होती. तब्बल चार वर्षानंतर ग्रामसेवकांना पुरस्कार वितरित झाल्याने आनंद व्यक्त केला जात होता. (प्रतिनिधी)

सन २०११-१२ मधील पुरस्कारप्राप्त ग्रामसेवक
एल.बी. मांडे (वरूड), पुरूषोत्तम येवले (धामणगाव रेल्वे), एस.जी. पखाले (अचलपूर), मनोज देशमुख (भातकुली), संदीप खोंड (तिवसा), आर.एन. बुरघाटे (अमरावती), वनिता घवळे (चांदूररेल्वे), आर.आर. दाभाडे (चांदूरबाजार), पी.जी. कोकाटे (अंजनगाव सुर्जी), राजेश्वर होले (दर्यापूर) युवराज जाधव (धारणी), एस.पी. जयसिंगपुरे (चिखलदरा).

सन २०१२-१३ मधील पुरस्कारप्राप्त ग्रामसेवक
विजया जोल्हे (अमरावती), रूपाली कोंडे (मोर्शी), मो. अतिकुर रहीम (भातकुली), संगीता दहिकवडे (चांदूररेल्वे), एस.टी.मोरे (अंजनगाव सुर्जी), एन.एस. आष्टीकर (दर्यापूर), अनंत बहादुरे (चिखलदरा), एन.टी काकड (धारणी), एम.एम. धांडे (चांदूरबाजार), विनोद कांबळे (तिवसा), रोहित बंड (अचलपूर).

सन २०१३-१४ मधील आदर्श ग्रामसेवक
अंबर यादगिरे (चांदूररेल्वे,) विनोद उमप (तिवसा), महेंद्र पोटे (धारणी), मनोज राऊत (मोर्शी), ललिता ढोक (धामणगाव रेल्वे) जे.एम. गजभिये (अमरावती), बाळू चव्हाण (चिखलदरा), पी.जी. गोंडेकर (चांदूररेल्वे), राजू खोजरे (अचलपूर),भरत निस्ताने(भातकुली)

२०१४-१५ मधील पुरस्काराचे मानकरी
जिल्हा परिषद पंचायत विभागाद्वारे सन २०१४-१५ मधील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झालेल्यांमध्ये पकंज पोकळे (मोर्शी), साधना सोनोने (धामणगाव रेल्वे), प्रवीण पाचघरे (चांदूररेल्वे), नीलेश भुसारी (तिवसा), मदन हरणे (चिखलदरा), नितीन गाणार (धारणी), एस.डी. नागदिवे (वरूड), आर.बी.हजारे (चांदूरबाजार), गजानन पालखडे (अचलपूर), प्रशांत टिंगणे (भातकुली) यांचा समावेश आहे.

विस्तार अधिकाऱ्यांना
प्रथमच पुरस्कार
चार पंचायत समितींमधील पंचायत विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांचाही जि.प.मार्फत पहिल्यांदाच आदर्श विस्तार अधिकारी म्हणून गौरव करण्यात आला. यामध्ये सन २०११-१२ चा पुरस्कार चांदूररेल्वे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संदीप देशमुख, सन २०१२-१३ चा तिवसा येथील सुधाकर उमक, सन २०१३-१४ मधील धारणीचे प्रल्हाद तेलंग तर सन २०१४-१५ चा पुरस्कार भातकुलीचे प्रेमानंद मेश्राम यांना बहाल करण्यात आला

Web Title: Gaurav honored with 43 Gramsevaks Model Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.