सुवर्णपदक प्राप्त स्वराचा कुलगुरूंच्या हस्ते गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2017 12:18 AM2017-03-18T00:18:07+5:302017-03-18T00:18:07+5:30
स्थानिक तोमोय स्कूलची विद्यार्थिनी स्वरा पवार हिने राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक राष्ट्रीय प्रतिभा खोज परीक्षेमध्ये सुवर्णपदक पटकाविले.
अमरावती : स्थानिक तोमोय स्कूलची विद्यार्थिनी स्वरा पवार हिने राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक राष्ट्रीय प्रतिभा खोज परीक्षेमध्ये सुवर्णपदक पटकाविले. या कामगिरीबद्दल कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते कुलगुरू कार्यालयात गुरूवारी आयोजित समारंभात तिचा गौरव करण्यात आला.
राष्ट्रीय पातळीवरील या परीक्षेमध्ये ५० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पहिल्या टप्प्यात सातशेपैकी तीनशे विद्यार्थी निवडण्यात आलेत. तिसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्यांना स्वत:चा प्रोजेक्ट बनवायचा होता. प्रोजेक्टसाठी स्वरा हिने ‘डायव्हरसिटी मॅपिंग अॅॅन्ड अॅन्टीआॅक्सिडंट प्रॉपर्टी आॅफ मेडिसिनल प्लाँट आॅफ अमरावती’ असा विषय निवडला होता. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्रोफेसर अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लॅबमध्ये प्रॅक्टिकल प्रोजेक्टसाठी तिने मदत घेतली. प्रोजेक्ट पॅनलमधील तज्ज्ञ परीक्षकांनी उत्कृष्टरीत्या प्रोजेक्ट सादरीकरणाबद्दल स्वरा हिचे कौतुक केले. (प्रतिनिधी)