गव्हाणकुंडचा प्रकल्प सूर्याकडे ‘आ’ वासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:12 PM2019-02-14T23:12:04+5:302019-02-14T23:12:21+5:30
मुख्यमंत्री, केंद्रीय दळणवळण मंत्र्यांच्या दिमतीला डझनभर मंत्र्याच्या साक्षीने २४ डिसेंबर २०१७ ला गव्हाणकुंड येथील ३० हेक्टर परिसरामध्ये सौरऊर्जेपासून २० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन थाटात पार पडले. सहा महिन्यातच सदर प्रकल्प पूर्ण करून साडेअठरा हजार शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करण्याचे ठोस आश्वासन मिळाले. तथापि, एक वर्षापासून प्रकल्पाच्या जागेला तारेच्या कुंपणापलीकडे प्रगती झाली नाही. सौरऊर्जा प्रकल्प सूर्याकडे ‘आ’ वासूनच आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरूड : मुख्यमंत्री, केंद्रीय दळणवळण मंत्र्यांच्या दिमतीला डझनभर मंत्र्याच्या साक्षीने २४ डिसेंबर २०१७ ला गव्हाणकुंड येथील ३० हेक्टर परिसरामध्ये सौरऊर्जेपासून २० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन थाटात पार पडले. सहा महिन्यातच सदर प्रकल्प पूर्ण करून साडेअठरा हजार शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा करण्याचे ठोस आश्वासन मिळाले. तथापि, एक वर्षापासून प्रकल्पाच्या जागेला तारेच्या कुंपणापलीकडे प्रगती झाली नाही. सौरऊर्जा प्रकल्प सूर्याकडे ‘आ’ वासूनच आहे.
बळीराजा जलसंजीवन योजेनेंतर्गत ३० हेक्टर महसुली जमिनीवर २० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पातून १८ हजार ८९६ शेतकºयांना नऊ उपकेंद्रांतून २४ तास वीजपुरवठा होणार होता. टेंभूरखेडा, बेनोडा, लोणी, शेंदूरजनाघाट आणि पुसला ही लाभार्थी गावे आहेत. १८ महिन्यांची मुदत असलेला हा प्रकल्प यावर्षी पूर्ण झाला असता, तर शेतकºयांना वीज वापरातून अनेक प्रश्न सुटले असते.