गाविलगड किल्ला १५ डिसेंबरला इंग्रजांनी केला होता काबीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:30 AM2020-12-15T04:30:03+5:302020-12-15T04:30:03+5:30
इतिहास : २१७ वर्षांपूर्वीची आठवण, १४ जणींनी घेतल्या होत्या अग्निकुंडात उड्या चिखलदरा ( अमरावती) : वर्हाडातील सर्वात मोठा गाविलगड ...
इतिहास : २१७ वर्षांपूर्वीची आठवण, १४ जणींनी घेतल्या होत्या अग्निकुंडात उड्या
चिखलदरा ( अमरावती) : वर्हाडातील सर्वात मोठा गाविलगड किल्ला १५ डिसेंबर १८०३ रोजी इंग्रजांनी जिंकला होता. त्याला २१७ वर्षे पूर्ण झाली आहेत.
इंग्रज-मराठे युद्ध जगप्रसिद्ध आहे, इंग्रज अधिकारी ऑर्थर वेलस्ली आणि नागपूरकर भोसल्यांकडून किल्लेदार बेनिसिंग यांच्यात हे युद्ध झाले.१५ डिसेंम्बर रोजी या घटनेस तब्बल २१७ वर्षे झालीत. १८०३ ला १४ डिसेंबरच्या रात्री शिड्या लावून व तोफांचा मारा करून शार्दुल दरवाजा इंग्रजांनी ताब्यात घेतला होता. १५ डिसेंबर दिल्ली दरवाजात निकराची लढाई झाली अन राजा बेनिसिंगसह त्यांचे सर्व मातब्बर सहकारी आणि सैनिक मारले गेले. इंग्रज सैन्यातील १५ जणांचा मृत्यू व ११० जखमी झाले होते
बॉक्स
बेनीसिंगच्या पत्नीसह महिलांनी केला जोहार
इंग्रज सैन्य आत घुसताच देव तलावाच्या काठावर रचून ठेवलेल्या चितांवर बेनिसिंगच्या पत्नीसह एकूण १४ स्त्रियांनी उड्या घेऊन जोहार केला. त्यामध्ये तिघींचा मृत्यू झाला. उर्वरित स्त्रिया वाचविला गेल्या होत्या. बेनीसिंग आणि त्यांच्या तीन पत्नींची समाधी एकाच ठिकाणी या गाविलगड किल्ल्यात आहे. हा ऐतिहासिक किल्ला आज दुर्लक्षित आहे. विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावरील एक महत्त्वपूर्ण ठिकाण असूनही पर्यटकांना आवश्यक माहिती येथे मिळत नाही.
किल्ला ब्रिटिशांनी जिंकल्यानंतर किल्ल्यासह संपूर्ण वऱ्हाडावर ब्रिटिशांचे अंकित निझामाची सत्ता आली. किल्ल्याच्या प्रत्येक दारासह किल्ला परिसरात एक दिवस कमी पडू शकेल एवढा खजिना आहे. त्यासंबंधी संशोधन होऊन तो खजिना बाहेर काढणे गरजेचे असल्याचे मत इतिहासतज्ज्ञ अनिरुद्ध पाटील यांनी ‘लोकमत''ला सांगितले.