अष्टविनायक नागरी सहकारी पतसंस्थेची आमसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:13 AM2021-09-27T04:13:17+5:302021-09-27T04:13:17+5:30
संस्थेचे कायम सभासद ३,३५१ आहेत. त्यांना सहा टक्क्यांप्रमाणे लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेला यावर्षी २३.२७ लाख रुपये इतका निव्वळ ...
संस्थेचे कायम सभासद ३,३५१ आहेत. त्यांना सहा टक्क्यांप्रमाणे लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेला यावर्षी २३.२७ लाख रुपये इतका निव्वळ नफा प्राप्त झाला. ऑडिट वर्ग 'अ' मिळाला आहे. संस्थेचा स्वनिधी ५.५३ लाख, भागभांडवल २.६९ लाख, सभासद ठेवी ५१.८२ लाख इतक्या आहेत. संस्थेची आर्थिक बाजू भक्कम असून सामाजिक कार्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शी व्यवहार, कायदे व नियमांचे पालन करून संस्थेचे आर्थिक व्यवहार सांभाळण्यात येतात. या वार्षिक अधिमंडळ सभेत संस्थेचे अध्यक्ष बी.आर. जगताप यांनी तेथील कार्याची थोडक्यात माहिती ठेवली. सभेपुढील विषयांचे वाचन व्यवस्थापकीय संचालक प्रा. व्ही.एम. वावरे व मुख्य कार्यकारी अधिकारी एम.ए. देशमुख यांनी केले. सभेचे समारोपीय आभार प्रदर्शन डॉ. ए.बी. घोंगडे यांनी केले. संस्थेचे सर्व संचालक डॉ. अढाऊ, ढोमणे, कवाणे, चोरे, गोहाड, राऊत, राऊत, तायवाडे व माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिचकार यांची उपस्थिती होती.