दर्यापूर बाजार समितीची सर्वसाधारण आमसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:16 AM2021-08-14T04:16:23+5:302021-08-14T04:16:23+5:30
दर्यापूर : येथील कृषिउत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण आमसभा गुरुवारी दुपारी पार पडली. दर्यापूर बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी ...
दर्यापूर : येथील कृषिउत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण आमसभा गुरुवारी दुपारी पार पडली.
दर्यापूर बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी राबणारी संस्था असून, आमच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या सर्वांगीण हिताचे निर्णय घेऊन त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यात आली आहे. पेट्रोल पंप, शेतकरी लिलाव भवन यांच्यासह अनेक विकासकामे आमच्या कार्यकाळात करण्यात आली, असे सभापती बाबाराव बरवट यांनी सांगितले. बाजार समितीच्या आवारात ३४ हजार स्क्वेअर फूटवर निर्माण करण्यात आलेल्या शेतकरी लिलाव भवनाचे उद्घाटन आमदार बळवंत वानखडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सभापती बाबाराव बरवट, उपसभापती नरेंद्र ब्राह्मणकर, संस्थेचे संचालक सुधाकर भारसाकळे, अरुण गावंडे, कुलदीप गावंडे, बाळासाहेब हिंगणीकर, अशोक मोहता राजेंद्र वडाळ, मीरा होले, रेखा गावंडे, साहेबराव भदे, सतीश साखरे, गोपाल अरबट, कपिल देवके, राजू धुरंधर, सदरोद्दीन समसोद्दीन, अनिल जळमकर, श्रीकांत होले, अनिल बोंडे, सुरेश कानुंगो, हर्षवर्धन शहा यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. प्रभारी सचिव हिंमत मातकर यांनी कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन केले.