सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 10:58 PM2019-01-25T22:58:21+5:302019-01-25T22:59:09+5:30

आरोग्याच्या सुविधा व योजनांचा खरा लाभ सामान्य व गरिब नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. उपचाराअभावी गरिब नागरिक मोठमोठया आजाराला बळी पडत असतात. सामान्य व गरिब माणसासाठी राज्य व केंद्र शासनाने आरोग्याच्या अनेक योजना सुरु केल्या आहेत. शासकीय रुग्णालयामधून या योजनांचा प्रसार होणे आवश्यक आहे.

Get healthcare to the general public | सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा

सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा

Next
ठळक मुद्देमधुकर कुकडे : रक्तदात्यांना ब्लड रिपोर्ट घरपोच, महाआरोग्य मेळाव्याचे उद्घाटन, शेकडो रुग्णांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आरोग्याच्या सुविधा व योजनांचा खरा लाभ सामान्य व गरिब नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. उपचाराअभावी गरिब नागरिक मोठमोठया आजाराला बळी पडत असतात. सामान्य व गरिब माणसासाठी राज्य व केंद्र शासनाने आरोग्याच्या अनेक योजना सुरु केल्या आहेत. शासकीय रुग्णालयामधून या योजनांचा प्रसार होणे आवश्यक आहे. रुग्णालयात येणाऱ्या गरिब माणसाला रुग्ण सेवेचा लाभ तर मिळालाच पाहिजे, मात्र जे व्यक्ती रुगणालयापर्यंत येऊ शकत नाहीत. अशा नागरिकांपर्यत आरोग्याच्या सुविधा आरोग्य विभागाने पोहचवाव्या, असे प्रतिपादन खासदार मधुकर कुकडे यांनी केले.
आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकार, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत २३ व २४ जानेवारीला जिल्हा रुग्णालय भंडारा येथे भव्य रोग निदान उपचार, आरोग्य प्रदर्शनी व महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या महामेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा डॉ. रवी धकाते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, डॉ. लोकनाथ गिºहेपुंजे, मोहिनूर रहमान शेख, डॉ. आर. एन. खंडागळे, चंद्रशेखर भोयर, डॉ. सुनिता बढे, सुनिल कुरंजेकर, बाबा पटेल, डॉ. विशाखा गुप्ते, डॉ. जक्कल, भगवान मस्के उपस्थित होते.
सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य रोगनिदान उपचार व आरोग्य मेळावा आयोजित केल्याचे सांगून खासदार म्हणाले, गरिबांना खाजगी रुग्णालयात उपचार करणे आर्थिक दृष्टया शक्य होत नाही. अशा लोकांना एकाच ठिकाणी सर्व आजारांचे रोगनिदान व उपचार मिळावे म्हणून महाआरोग्य मेळावा ही संकल्पना अतिशय उत्तम आहे. या ठिकाणी येणाºया नागरिकांची सर्व प्रकारचे उपचार होणे आवश्यक आहे. यासाठी शासनाच्या आरोगयविषयक योजनांचा गरजुंना एकत्रित लाभ देण्यात यावा.
सामान्य रुग्णांना सेवा देण्यात जिल्हा रुग्णालय शिखरावर असून या रुग्णालयात सर्व अत्याधूनिक सेवा सुविधा उपलब्ध आहेत. या सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक संचालक आरोग्य विभाग डॉ. रवी धकाते यांनी केले. शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना सामान्य व्यक्तीसाठी असून या योजनांचा सुध्दा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले. सामान्य रुग्णालय भंडारा येथे कॅथलॅब मंजूर झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सामान्य रुग्णालयात दररोज हजार ते पंधराशे रुग्ण येत असून कमी मनुष्यबळात उत्कृष्ट सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. अत्याधुनिक यंत्र सामुग्री या ठिकाणी उपलब्ध आहे. याचा लाभ रुगणांना देण्यासाठी रुग्णालय सदैव तत्पर आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी सांगितले. भंडारा येथे वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यकता असून या मागणीचा पाठपूरावा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हृदयरोग, मधुमेह, मुत्रपिंडांचे आजार, अस्थिरोग, मानसिक आजार, मिरगी, चर्मरोग, गुप्तरोग, एचआयव्ही, कान-नाक-घसा, नेत्र, गर्भाशयाचे आजार इत्यादी सर्व प्रकारच्या आजारांची तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करुन रुग्णांवर औषधोपचार केला.
रक्तदात्यांना मिळणार सुविधा
महाआरोग्य मेळाव्यात ज्या नागरिकांनी रक्तदान केले आहे. अशा सर्व रक्तदात्यांचे ब्लड रिपोर्ट त्यांना घरपोच देण्याची व्यवस्था जिल्हा सामान्य रुग्णालयाने करावी, अशा सूचना खासदार मधुकर कुकडे यांनी दिल्या. रक्तदान केल्यानंतर ब्लड रिपोर्टसाठी वाट न पहाता रक्तदात्याने आपला पत्र व्यवहाराचा पत्ता नोंदवून द्यावा. जेणेकरुन प्रत्येकाला ब्लड रिपोर्ट घरपोच पाठविता येईल.

Web Title: Get healthcare to the general public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.