स्मार्ट सिटीत सामान्यांना स्थान मिळावे- महापौर
By admin | Published: November 7, 2015 12:10 AM2015-11-07T00:10:29+5:302015-11-07T00:10:29+5:30
देशातील १०० शहरांत अमरावती शहराचा स्मार्ट सिटी उपक्रमात समावेश करण्यात आला,
देशातील १०० शहरांत अमरावती शहराचा स्मार्ट सिटी उपक्रमात समावेश करण्यात आला, ही बाब अमरावतीकरांसाठी अभिमानाची आहे. मात्र स्मार्ट सिटीचे स्वप्न साकारताना यात सामान्यांना स्थान मिळाले पाहिजे, अशी रचना व्हावी, असे प्राजंळ मत महापौर चरणजितकौर नंदा यांनी व्यक्त केले. शहराला स्मार्ट सिटीचे मूर्तरुप देण्यासाठी गुरुवारी कार्यशाळा पार पडली. यावेळी दोन मतप्रवाह पुढे आले. नवे शहर साकारावे किंवा जुन्या शहराचा विकास करावा ?. अमरावती शहर हे स्मार्ट सिटी व्हावी, यासाठी महापालिका प्रशासन अनेक महिन्यांपासून परिश्रम घेत आहेत. या स्मार्ट सिटीत अभियंते, वास्तुशिल्पकार, डॉक्टर्स, व्यावसायिक, प्राध्यापक आदींना स्थान देण्यास हरकत नाही. मात्र या प्रकल्पात सामान्य व्यक्ती केंद्रबिंदू असलाच पाहिजे, असे महापौर म्हणाल्या. पहिल्या टप्प्यात जागेचा प्रश्न सोडवावा लागणार आहे. मूलभूत, पायाभूत सुविधांना प्राधान्य देताना विकास, रोजगार, उद्योग, अद्ययावत सोई सुविधांना स्थान मिळाले पाहिजे. स्मार्ट सिटी प्रक ल्पात अमरावती शहराचा समावेश होईल, ही बाब अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्याकरिता सर्वच लोकप्रतिनिधींच्या सहकार्याची गरज असून अशी संधी कधीही मिळणार नाही, असे त्या म्हणाल्यात.