जळू-बेलोरा वळण रस्ता वाहतुकीस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:59 PM2018-03-26T23:59:46+5:302018-03-26T23:59:46+5:30

बेलोरा विमानतळ विस्तारीकरणात अडथळा ठरणारा जळू ते बेलोरा टी-पॉइंट वळण रस्त्याची निर्मिती पूर्ण झाली असून, हा रस्ता शुभारंभाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, अकोल्याकडून राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने तूर्तास हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार नाही, अशी माहिती आहे.

Get ready for traffic on the route of Jalu-Belora | जळू-बेलोरा वळण रस्ता वाहतुकीस सज्ज

जळू-बेलोरा वळण रस्ता वाहतुकीस सज्ज

googlenewsNext
ठळक मुद्देविमानतळ विकासाने गाठला टप्पा : राष्ट्रीय महामार्गाशी जोडणार

आॅनलाईन लोकमत
अमरावती : बेलोरा विमानतळ विस्तारीकरणात अडथळा ठरणारा जळू ते बेलोरा टी-पॉइंट वळण रस्त्याची निर्मिती पूर्ण झाली असून, हा रस्ता शुभारंभाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, अकोल्याकडून राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने तूर्तास हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार नाही, अशी माहिती आहे.
बेलोरा विमानतळाच्या विकासकामांनी गती घेतली आहे. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी राज्य मार्गावर कार्यारंभ झालेला जळू ते बेलोरा हा ३.८० कि.मी. लांबीचा वळण रस्ता पूर्णत्वास आला आहे. नव्या वळण मार्गावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. पूल, रस्ता ओलांडणे, झेब्रा क्रॉसिंग, गावांची सीमा, गावांचे अंतर, पायदळ मार्ग अशी वाहतूक नियमावलींशी सुसंगत फलके वळण मार्गावर उभारण्यात आली आहे. वळण रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली की, यवतमाळकडे ये-जा करणारी वाहने ही राष्ट्रीय महामार्गाच्या बेलोरा टी पॉइंट येथून जळू व पुढे यवतमाळ-अमरावती अशी जातील. यानंतर जुना यवतमाळ मार्ग बंद केला जाईल. त्यानंतर विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम प्रारंभ होईल, अशी माहिती बेलोरा विमानतळाचे प्रबंधक एम.पी. पाठक यांनी दिली. हा वळण मार्ग साबांविच्या नियंत्रणात बांधला गेला. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे हा वळण मार्ग मुख्य मार्गाशी केव्हा जोडणार, असा सवाल परिसरातील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. वळण मार्गामुळे जळू गावाला झळाळी आली आहे.
‘बी अँड सी’ला आदेशाची प्रतीक्षा
जळू ते बेलोरा वळण रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, हा मार्ग वाहतुकीसाठी केव्हा सुरू करावा, याची केवळ प्रतीक्षा आहे. विशेषत: पालकमंत्री प्रवीण पोटे, आ. सुनील देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, आ. रवि राणा यांच्या सततच्या प्रयत्नाने विमानतळाची विकासकामे मार्गी लागत आहेत. वळण मार्ग वाहतुकीसाठी सज्ज झाला असला तरी विधिवत शुभारंभाशिवाय या मार्गावरून वाहने धावणार नाहीत, हे वास्तव आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणात जळू ते बेलोरा वळण मार्गाला जोडले जाईल. वळण रस्त्याची निर्मिती म्हणजे बेलोरा विमानतळ विकासाचे महत्त्वाचे पाऊल आहे.
- प्रवीण पोटे
पालकमंत्री, अमरावती.

Web Title: Get ready for traffic on the route of Jalu-Belora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.