शंकर महाराजांना अटक करा

By Admin | Published: August 26, 2016 12:20 AM2016-08-26T00:20:06+5:302016-08-26T00:20:06+5:30

धामणगाव तालुक्यातील पिंपळखुटा येथील शंकर महाराज संस्थेद्वारा संचालित मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थी प्रथमेश

Get Shankar Maharaj arrested | शंकर महाराजांना अटक करा

शंकर महाराजांना अटक करा

googlenewsNext

अनिल गोंडाणे यांची मागणी : जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
अमरावती : धामणगाव तालुक्यातील पिंपळखुटा येथील शंकर महाराज संस्थेद्वारा संचालित मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थी प्रथमेश सगणे याच्या नरबळी प्रकरणी संस्थानचे प्रमुख शंकर महाराज यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी रिपाइंचे माजी आमदार अनिल गोंडाणे यांनी केली आहे. याआशयाचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आले आहे.
प्रथमेशच्या नरबळी प्रकरणाने संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला असताना अद्यापही या घटनेला जबाबदार असलेल्या शंकर महाराजांना पोलीस प्रशासनाने अटक का केली नाही? असा सवाल माजी आ. गोंडाणे यांनी पोलिसांना केला आहे. प्रथमेश हा मागासवर्गिय असल्यामुळे नरबळीचे प्रकरण दाबल्या जात असेल तर या अन्यायाविरुद्ध रिपाइं (आठवले गट)च्यावतीने तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. शंकर महाराज आश्रमाची सीबीआयकडून चौकशी झाल्यास बरेच तत्थ समोर आल्याशिवाय राहणार नाही, असेही अनिल गोंडाणे यांनी म्हटले आहे. प्रथमेशचा गळा कापून जखमी करण्यात आले. हा काय प्रकार आहे, याचे वास्तव पोलिसांनी शोधून काढणे गरजेचे असताना शंकर महाराजांना अभय दिला जात असल्याचे आरोपही त्यांनी केला. पिंपळखुटा येथील संस्थानचे अध्यक्ष शंकर महाराज हे आहेत. प्रथमेशचा नरबळी देण्याची घटना सुद्धा यापरिसरात झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी शंकर महाराज यांना ताब्यात घेवून चौकशी करावी, अशी मागणी अनिल गोंडाणे यांनी केली आहे. शंकर महाराज हे पैशाचा पाऊस पाडणार या भावनेतून प्रथमेचा नरबळी झाल्याचे सांगण्यात येत आहे. असे असताना पोलीस याप्रकरणाचे वास्तव जनतेसमोर का आणत नाही? असा सवाल त्यांनी निवेदनातून केला आहे. यावेळी रिपाइंचे समाधान वानखडे उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Get Shankar Maharaj arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.