सूक्ष्म सिंचन योजनांचे अनुदान मिळावे
By admin | Published: February 17, 2016 12:10 AM2016-02-17T00:10:01+5:302016-02-17T00:10:01+5:30
ठिबक तुषार संचाचे सन २०१४-२०१५ मधील अनुदान तत्काळ मिळावे, अन्यथा जिल्हा कचेरीसमोर १९ फेब्रुवारीला उपोषणाला बसू, ...
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : १९ फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांचे उपोषण
अमरावती : ठिबक तुषार संचाचे सन २०१४-२०१५ मधील अनुदान तत्काळ मिळावे, अन्यथा जिल्हा कचेरीसमोर १९ फेब्रुवारीला उपोषणाला बसू, असे निवेदन नांदगाव खंडेश्वर येथील शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिले.
जिल्ह्यात सूक्ष्म सिंचनाचे अनुदान वाटपासाठी कृषी विभागाला निधी प्राप्त झाला. या विभागाव्दारा यंदाच्या प्रस्तावाचे अनुदान वाटप सुरू आहे. मात्र मागील वर्षीचे अनुदान अद्याप प्रलंबित आहे. हे अनुदान प्रथम द्यावे, अशी मागणी नांदगाव येथील राजेंद्र जवळकर, गोपाल शर्मा, साहेबराव आयले, मंगेश तेलखेडे, बाळकृष्ण धर्माळे, वैभव कोरडे आदी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)