डेंग्यूची तपासणी तिवसा उपजिल्हा रुग्णालयातच करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:11 AM2021-07-20T04:11:03+5:302021-07-20T04:11:03+5:30
तिवसा : तिवसा उपजिल्हा रुग्णालयात डेंग्यूची तपासणी होत नसून तपासणीकरिता रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठविले जाते तेव्हा तिवसा शासकीय ...
तिवसा : तिवसा उपजिल्हा रुग्णालयात डेंग्यूची तपासणी होत नसून तपासणीकरिता रुग्णांना खासगी रुग्णालयात पाठविले जाते तेव्हा तिवसा शासकीय रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त असताना डेंग्यूची तपासणी होत नसल्याने तिवस्यातच डेंग्यूची तपासणी करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
तिवसा उपजिल्हा रुग्णालयात डेंग्यूची तपासणी होत नसल्याचा आरोप तक्रारी वंचित बहुजन आघाडीने केला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयावर धडक देऊन डेंग्यू तपासणी रुग्णालयातच करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. शासकीय रुग्णालयात भर्ती होणारा रुग्ण हा सामान्यत: गरीब समूहातील असतो व खाससगी रुग्णालयात डेंग्यूची तपासणी फी ४०० ते ५०० रुपये घेतले जाते, तेव्हा गरीब रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबवून उपजिल्हा रुग्णालयातच डेंग्यू तपासणी करण्यात यावी, अन्यथा उपजिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर भवते यांनी दिला आहे. मागणीचे निवेदन वैद्यकीय अधीक्षक डॉ. विधळे यांना देण्यात आले. निवेदन सादर करतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव प्रा. सुधीर वानखडे, प्रशांत कुरहेकर, पंकज गजरे, सचिन बुटले, राहुल मनवर, सिद्धार्थ कटारणे, सागर गोपाळे, बबलू मुंद्रे, राहुल गोपाळे, सम्यक हगवने, श्रीधर शापामोहन, मिलिंद यावले, सुरेंद्र कासुर्डेसह कार्यकर्ते उपस्थित होते.