स्वस्त मिळतंय? सावध व्हा, दिवाळे निघणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 05:00 AM2021-11-03T05:00:00+5:302021-11-03T05:00:47+5:30

कोरोनामुळे मार्केटमध्ये शांतता होती. मात्र, यंदा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन खरेदीला उधाण आले आहे. गिफ्ट व्हाउचरचे आमिष दाखवून गरजेपेक्षा अधिक खरेदी करण्यासदेखील बाध्य केले जात असल्याचे वास्तव आहे. व्हाउचर स्क्रॅच करण्यासाठी लिंक दिली जात आहे. त्यामुळे सेल, गिफ्टमध्ये वाहवत न जाता सजगपणे व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Getting cheaper? Beware, the bust will go away! | स्वस्त मिळतंय? सावध व्हा, दिवाळे निघणार!

स्वस्त मिळतंय? सावध व्हा, दिवाळे निघणार!

Next

प्रदीप भाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अनेक ई-कॉमर्स वेबसाइटस्नी बंपर सेल घोषित करण्यात आलेले आहेत. बाजारभावापेक्षा कमी किमतीत मिळत असल्याचे पाहून अशा वेबसाइटस्वरील उत्पादनांवर उड्यादेखील पडत आहेत. मात्र, यातून फसवणुकीचे प्रमाणदेखील तेवढेच वाढल्याचे पुढे येऊ लागले आहे. त्यामुळे स्वस्त किंवा सवलतीत मिळतेय म्हणून कुठल्याही लिंकवर क्लिक करण्याचा मोह टाळायला हवा. दिवाळीच्या दिवसात मोठी फसवणूक होऊ शकते. त्यामुळे डोळसपणे आर्थिक व्यवहार करणे गरजेचे आहे. 
कोरोनामुळे मार्केटमध्ये शांतता होती. मात्र, यंदा दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइनखरेदीला उधाण आले आहे. गिफ्ट व्हाउचरचे आमिष दाखवून गरजेपेक्षा अधिक खरेदी करण्यासदेखील बाध्य केले जात असल्याचे वास्तव आहे. व्हाउचर स्क्रॅच करण्यासाठी लिंक दिली जात आहे. त्यामुळे सेल, गिफ्टमध्ये वाहवत न जाता सजगपणे व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शेवटच्या काही तासांची ऑफर

- शेवटच्या काही तासांची ऑफर’ अशी टॅगलाइन वापरून फसवणूक होऊ शकते. अशा जाहिरातींमधील वस्तूंची, ब्रँडची खातरजमा करावी.
- जी वस्तू बाजारपेठेत २ हजार रुपयांची आहे, ती आता ऑर्डर केल्यास ५०० रुपयांत मिळविण्याचे प्रलोभन दाखविले जाते. मात्र, ५०० रुपयांमध्ये मिळणारी ती वस्तू खरोखर टिकाऊ आहे की टाकाऊ, हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे.

ऑनलाइन खरेदीपूर्वी ही घ्या काळजी 
बनावट वेबसाइटपासून सावध राहा, अधिकृत वेबसाइटला प्राधान्य द्या. शक्यतो कॅश ऑन डिलिव्हरी ऑप्शन निवडा. उत्पादन खरेदी करण्यापूर्वी इतर ग्राहकांनी दिलेले रिव्ह्यू नक्की वाचा. ऑनलाइन पेमेंट करताना क्रेडिट कार्डवरून ईएमआय करीत असाल तर, त्याचे हप्ते व कालावधी लक्षात घ्या. शक्यतो डिलिव्हरी देणाऱ्या व्यक्तीसमोर पार्सल उघडा. 

ओळखीच्या दुकानातच खरेदी केलेली बरी
‘आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून प्रतिष्ठान चालवीत आहोत. ब्रँड उत्पादनाची विक्री करतो. प्रतिष्ठान स्थायी स्वरूपाचे आहे. त्यामुळे ग्राहकांनी स्थानिकांच्या दुकानांना वाव द्यावा.
एक व्यावसायिक

स्वस्त मिळतंय म्हणून हरखून जाऊ नका. जी वस्तू सवलतीत मागविली, त्या वस्तूंचा दर्जा अवश्य बघावा, अनोळखी लिंकवर जाऊ नका. क्युआर कोड स्कॅन करू नका. कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडा.
- रवींद्र सहारे, एपीआय सायबर ठाणे

 

Web Title: Getting cheaper? Beware, the bust will go away!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.