जिल्ह्यात ४,८९६ जागांसाठी ११,१८७ उमेदवारांमध्ये घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:36 AM2021-01-08T04:36:04+5:302021-01-08T04:36:04+5:30

अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे धूमशान सध्या सुरू आहे. यामध्ये सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सोमवारी १,२१५ ...

Ghamasan among 11,187 candidates for 4,896 seats in the district | जिल्ह्यात ४,८९६ जागांसाठी ११,१८७ उमेदवारांमध्ये घमासान

जिल्ह्यात ४,८९६ जागांसाठी ११,१८७ उमेदवारांमध्ये घमासान

Next

अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे धूमशान सध्या सुरू आहे. यामध्ये सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सोमवारी १,२१५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक रिंगणात ११,१८७ उमेदवार आहेत. आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी १५ डिसेंबरला मतदान व १८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

जिल्ह्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या प्रक्रियेमध्ये सोमवारी १२१५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ११,१८७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अमरावती तालुक्यात १२९, भातकुली ७०, नांदगाव खंडेश्वर १२०, दर्यापूर १८५, अंजनगाव सुर्जी १५७, तिवसा ५२, चांदूर रेल्वे ५०, धामणगाव रेल्वे ८०, अचलपूर ९०, चांदूर बाजार ६०, मोर्शी ५८, वरुड ७१, धारणी ५१ व चिखलदरा तालुक्यात ४२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

सोमवारी दुपारी ३ नंतर उमेदवारांना चिन्हवाटप करण्यात आले. उशिरापर्यत चिन्हवाटपाची प्रक्रिया सुरू असल्याने उमेदवारी अर्जांची माघार घेतलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा निवडणूक विभागाने मंगळवारी जाहीर केली. ५५३ ग्रामपंचायतींच्या १८२३ प्रभागांमध्ये ही निवडणूक होत असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.

पाॅईंटर

जिल्ह्यात निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती -५५३

एकूण प्रभागांची संख्या - १८२३

निवडणूक रिंगणातील उमेदवार - ११,१८७

बॉक्स

असे आहेत तालुकानिहाय उमेदवार

ग्रामपंचायत निवडणुकीत सोमवारी १,२१५ अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर ११,१८७ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये अमरावती तालुक्यात ९३४, भातकुली तालुक्यात ६९७, नांदगाव खंडेश्वर ८०३, दर्यापूर १,०४३, अंजनगाव सुर्जी ७३२, तिवसा ६०४, चांदूर रेल्वे ५१९, धामणगाव रेल्वे १,०९७, अचलपूर ८६७, चांदूर बाजार ८५४, मोर्शी ८२२, वरूड ९२५, धारणी ७९३ व चिखलदरा तालुक्यात ४९७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

बॉक्स

या ग्रामपंचायतींकडे जिल्ह्याचे लागले लक्ष

जिल्ह्यात १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायती सर्वांत मोठ्या आहेत. यामध्ये दर्यापूर तालुक्यातील येवदा, अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर व चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा आदी ग्रामपंचायती आहेत. विधानसभा मतदारसंघात या ग्रामपंचायतींचा दबदबा असल्याने आमदार बळवंत वानखडे, आमदार राजकुमार पटेल, आमदार प्रताप अडसड व ना. बच्चू कडू यांची प्रतिष्ठा या गावांत पणाला लागली आहे.

बॉक्स

सात ऑर्ब्झव्हर, १९,४१६ मनुष्यबळ

जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींसाठी ३७० आरओ व एआरओ तसेच सात निवडणूक निरीक्षकांची नेमणूक जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे. एकूण २,२१४ मतदान केंद्रांवर १८,९९० मतदान अधिकारी व १० ग्रामपंचायतींकरीता एक याप्रमाणे ५६ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे एकूण १९,४१६ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

बॉक्स

एक न्यायालयीन प्रकरण दाखल

ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात उमेदवारी अर्जाच्या दिनांकापासून ते ४ जानेवारीपर्यंत एक न्यायालयीन प्रकरण मंगेश देशमुखविरुद्ध राज्य निवडणूक आयोगाकडे दाखल झाले आहे. ५ फेब्रुवारी २०२० चा मतदार यादी कार्यक्रम व २४ फेब्रुवारी २०२० चा रद्द केलेला कार्यक्रम पुढे सुरू ठेवण्याबाबत ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे, याप्रकरणी चांदूर बाजार येथील तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.

Web Title: Ghamasan among 11,187 candidates for 4,896 seats in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.