बच्चू कडू यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:31 PM2019-01-18T23:31:41+5:302019-01-18T23:31:59+5:30

भिंत कोसळून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांसह गावकरी संतप्त झाले. तथापि, ते आक्रमक होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा पोहोचला. शाळेचे संचालक आ. बच्चू कडू यांना बोलावा, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतल्याने प्रचंड गोंधळ उडाला.

Gherao Kadu detained | बच्चू कडू यांना घेराव

बच्चू कडू यांना घेराव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भिंत कोसळून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाइकांसह गावकरी संतप्त झाले. तथापि, ते आक्रमक होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा पोहोचला. शाळेचे संचालक आ. बच्चू कडू यांना बोलावा, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतल्याने प्रचंड गोंधळ उडाला. शाळेचे अध्यक्ष वसु महाराज यांनी गावकºयांना समजाविण्याचे प्रयत्न केले. मात्र, आधी शाळा व्यवस्थापनातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करा आणि आ. बच्चू कडूंना बोलावा, ही मागणी गावकºयांनी त्यांच्याकडे रेटून धरली.
हतबल झालेल्या छोटू महाराज वसू यांनी आ. बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला. काही वेळानंतर आ. कडू यांचे वाहन शाळेच्या आवारात दाखल झाले. गावकऱ्यांनी वाहनाकडे धाव घेतली. पोलिसांनीही आपला मोर्चा वाहनाकडे वळविला. आ. कडूंच्या वाहनाच्या अवतीभवती गावकऱ्यांचा मोठ्या जमावडा जमला. पोलिसांनी सुरक्षा दिल्यानंतर आ. कडू वाहनाबाहेर आले. त्यावेळी नातेवाइकांसह गावकऱ्यांचा प्रचंड आक्रोश होता. एकाच वेळी अनेक जण आ. कडू यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी आ. कडू यांना सरंक्षण देत घटनास्थळापर्यंत नेले. त्यापाठोपाठ शेकडो गावकऱ्यांचा जमाव होता. चालत असताना काही गावकरी आ. कडू यांच्याशी बोलण्यासाठी झेपावत होता. त्यामुळे आ. बच्चू कडू यांच्याही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. घटनास्थळाची पाहणी करून आ.कडू यांना शाळेच्या एका खोलीत नेण्यात आले.
पोलिसांनी मृतक व जखमींच्या नातेवाईकांना आत नेले आणि दार बंद केले. मात्र, आत शिरण्यासाठी गावकऱ्यांची चढाओढ लागली होती. बाहेर गावकऱ्यांचा आरडाओरड, तर आत नातेवाइकांचा आक्रोश अशा स्थितीत आ.कडू यांनी नातेवाइकांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्याच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
शाळेतील साहित्यांची फेकाफेक
भिंत कोसळून मुलाचा मृत्यू झाल्यानंतर गावकऱ्यांनी मुख्याध्यापकांसह शिक्षकांवर धावा बोलला. शाळेच्या कार्यालयात जाऊन तोडफोड करण्याचे प्रयत्न सुरू केले. यावेळी काही शिक्षकांनी गावकऱ्यांवर खुर्च्या उचलून फेकल्याचेही चर्चा सुरू आहे. नातेवाईक व गावकऱ्यांच्या रोष पाहून मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेत पळ काढले. त्याचवेळी पोलिसांनी मुख्याध्यापकासह शिक्षकांना ताब्यात घेऊन वलगाव ठाण्यात नेले. गावातील तणावाची स्थिती पाहता मुख्याध्यापक व शिक्षकांना गाडगेनगर ठाण्यात हलविण्यात आले होते.
नागरिकांच्या रोषामुळे पोलिसांची दमछाक
घटनेच्या माहितीवरून पोलीस पाटील प्रवीण प्रधान यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य पाहून त्यांनी तत्काळ वलगाव पोलिसांना माहिती दिली. दहा ते पंधरा मिनीटांत पोलिसांचा मोठा ताफा शाळेत पोहोचला. पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, सहायक पोलीस आयुक्त रणजित देसाई यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस शिपाई, क्यूआरटी पथक असा तब्बल शंभरावर पोलिसांचा ताफ्याने बंदोबस्ताची धुरा सांभाळली. पोलिसांनी नातेवाइकांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. आ. बच्चू कडू यांचे आगमन झाल्यानंतर पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. आमदाराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. आ.कडूंना पोलिसांनी सरंक्षण दिले.
राजकीय पदाधिकाऱ्यांची भेट
भारतीय जनता पार्टीचे दिनेश सूर्यवंशी, निवेदिता चौधरी, नाना नागमोते यांच्यासह अन्य काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी आष्टीच्या शाळेत भेट देऊन मृत व जखमींच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. त्यांच्या मागण्या ऐकून त्यावर अंमलबजावणी कशी करता येईल, यावर लक्ष दिले. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिले.

इमारतीच्या भिंती शिकस्त असल्याचे माहिती असतानाही शाळा प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचे दिसून येते. त्यानुसार तक्रार प्राप्त झाली असून, गुन्हा नोंदवून सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
- यशवंत सोळंके,
पोलीस उपायुक्त, अमरावती

Web Title: Gherao Kadu detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.