गणराच्या मूर्तीसोबत ‘एक रोपटे, एक कुंडी’ भक्तांना भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:14 AM2021-09-11T04:14:56+5:302021-09-11T04:14:56+5:30

सामाजिक वनीकरणाचा उपक्रम, पर्यावरण पुरक गणेश उत्सवाचे थाटात उदघाटन अमरावती : येथील सामाजिक वनीकरण परिक्षेत्रातर्फे एक रोप, तसेच वाईल्ड ...

A gift to the devotees of 'Ek Ropte, Ek Kundi' along with the idol of Ganara | गणराच्या मूर्तीसोबत ‘एक रोपटे, एक कुंडी’ भक्तांना भेट

गणराच्या मूर्तीसोबत ‘एक रोपटे, एक कुंडी’ भक्तांना भेट

Next

सामाजिक वनीकरणाचा उपक्रम, पर्यावरण पुरक गणेश उत्सवाचे थाटात उदघाटन

अमरावती : येथील सामाजिक वनीकरण परिक्षेत्रातर्फे एक रोप, तसेच वाईल्ड लाईफ अवेरनेस रिसर्च ॲन्ड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीच्यावतीने एक कुंडी गणपती बाप्पांच्या मूर्तीसोबत भेट हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.

शुक्रवारी श्रींची स्थापना करण्यात आली. भक्तांनी मोठ्या आनंदात लाडक्या बाप्पाला वाजत, गाजत आगमन केले. मात्र, सामाजिक वनीकरण विभागाने गणेश उत्सवादरम्यान मातीच्या मूर्तीची प्रतिस्थापना करून घरीच कुंडीमध्ये विसर्जन करून त्यात रोप लावून बाप्पाच्या आठवणी जतन करण्याचा व पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्याचा संदेश देण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन सामाजिक वनीकरणाचे वनपरिक्षेत्राधिकारी आशिष काेकाटे, वार संघटनेचे अध्यक्ष नीलेश कांचनपुरे यांच्या हस्ते लहान मुलांना बाप्पाच्या मुर्तीसोबत एक रोप व एक कुंडी वाटप करण्यात आले. यावेळी एकूण ४०० विविध प्रकारच्या रोपाचे वाटप करून वृक्षांची जोपासना हिच ईश्वराची उपासना असा संदेश सामाजिक वनीकरणतर्फे देण्यात आला.

Web Title: A gift to the devotees of 'Ek Ropte, Ek Kundi' along with the idol of Ganara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.