मुलीने दिला पित्याला खांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 10:22 PM2019-03-19T22:22:25+5:302019-03-19T22:22:51+5:30

वंशाचा दिवा मुलगाच, हा अट्टहास आता मागे पडत आहे. त्यामुळे अचलपूर तालुक्यातील मल्हारा येथे वृद्धापकाळाने निधन पावलेल्या वडिलांना मुलीने भडाग्नी दिला. या पुरोगामी व काहीशा धाडसी पावलाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

Girl gives shoulder shoulder | मुलीने दिला पित्याला खांदा

मुलीने दिला पित्याला खांदा

Next
ठळक मुद्देमल्हारा येथील घटना : पंचक्रोशीत कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : वंशाचा दिवा मुलगाच, हा अट्टहास आता मागे पडत आहे. त्यामुळे अचलपूर तालुक्यातील मल्हारा येथे वृद्धापकाळाने निधन पावलेल्या वडिलांना मुलीने भडाग्नी दिला. या पुरोगामी व काहीशा धाडसी पावलाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
मल्हारा येथील हनुमान मंदिरात सुमारे १६ वर्षांपासून पुजारी असलेले विठ्ठलराव ढाकूलकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांना दोन्ही मुली. त्यांची मोठी मुलगी ज्योती प्रमोद शिंगाडे (रा. रविनगर, परतवाडा) यांनी अंत्यसंस्काराचे विधी करून आपल्या वडिलांना भडाग्नी दिला. ग्रामीण भागात फक्त मुलांची हट्ट धरणाऱ्या आई-वडिलांसाठी हे झणझणीत अंजन असल्याच्या प्रतिक्रिया या घटनेच्या अनुषंगाने उमटत आहेत.
दरम्यान, विठ्ठलराव ढाकूलकर यांच्या निधनाची वार्ता कळताच त्यांच्या नातेवाइकांनी मल्हारा गाठले. परंपरेनुसार पुरुषच पार्थिवाला खांदा व अग्नी देत असल्याने, ही जबाबदारी कुणी पार पाडायची, असा प्रश्न नातेवाइकांना पडला. त्यावर वडिलांप्रमाणे पुरोगामी विचारशैली अंगीकारणाऱ्या ज्योती यांनी पुढाकार घेऊन आपण पित्यावर अग्निसंस्कार करणार असल्याचे सांगितले. विठ्ठलराव ढाकूलकर यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत.

Web Title: Girl gives shoulder shoulder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.