विद्यार्थिनीला मारहाण करताना फुटेज मिळाले

By admin | Published: September 1, 2015 12:07 AM2015-09-01T00:07:02+5:302015-09-01T00:07:02+5:30

महाविद्यालयीन विद्यार्थिनीला थप्पडमार प्रकरण महीला पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहेत.

The girl got footage while trying to beat her | विद्यार्थिनीला मारहाण करताना फुटेज मिळाले

विद्यार्थिनीला मारहाण करताना फुटेज मिळाले

Next

थप्पडमार प्रकरण : पीएसआयच्या अंगलट येण्याची चिन्हे
अचलपूर : महाविद्यालयीन विद्यार्थिनीला थप्पडमार प्रकरण महीला पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहेत. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
२९ आॅगस्ट रोजी वाहन परवाना जवळ का बाळगला नाही, या कारणावरून अचलपूरचे पोलीस उपनिरीक्षक तिरपुडे यांनी चावलमंडी येथे जगदंब महाविद्यालयाची विज्ञान शाखेची तृतीय वर्षाची विद्यार्थिनी स्नेहल गजानन रोडगे (१९, रा. अभिनव कॉलनी) हिला कानशिलात लगावली होती. यात तिच्या कानाच्या आत दुखापत झाली. तिने उपजिल्हा रुग्णालयात कानावर उपचार केले होते. याची लेखी तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांचेकडे केली होती. यावेळी तिचे वकील व्ही.आर. घाटे उपस्थित होते. या प्रकरणामुळे अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या घटनेच्या निषेधार्थ महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींची मोर्चाची तयारी सुरू आहे.
संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक गौतम यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी बी. डी. पौनिकर यांना दिले आहेत.
स्रेहल रोडगे हिला भररस्त्यात मारहाण करून अपमानित करणाऱ्या पीएसआय तिरपुडे यांच्यावर कायदेशीर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नरेंद्र फिसके, माजी सरपंच दिलीप राऊत, सतीश आकोलकर, विनय चतूर, नगरसेवक संजय भोंडे, माधुरी शिंगणे, श्रीधर क्षीरसागर आदींनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The girl got footage while trying to beat her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.