मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी, पुरस्कार १०० रुपयांचा!

By admin | Published: April 5, 2016 03:11 AM2016-04-05T03:11:11+5:302016-04-05T03:11:11+5:30

मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी करणाऱ्या जिल्ह्यातील ४३१ प्राथमिक शिक्षक आणि २० शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना

Girls' excellent screening, prize of 100 rupees! | मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी, पुरस्कार १०० रुपयांचा!

मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी, पुरस्कार १०० रुपयांचा!

Next

अमरावती : मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी करणाऱ्या जिल्ह्यातील ४३१ प्राथमिक शिक्षक आणि २० शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. निवड करण्यात आलेल्या पुरस्कर्त्यांना प्रत्येकी १०० रूपये रोख आणि प्रमाणपत्र वितरित करावे, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.
हा उत्कृष्टतेचा पुरस्कार मिळविणाऱ्यांनी पुरस्काराबाबत समाधान व्यक्त केले असले तरी चांगल्या व समाजोपयोगी कामाची किंमत केवळ १०० रुपयेच का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
शिक्षणातील मुलींचा टक्का वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. ‘बेटी बचाव - बेटी पढाओ’ या उपक्रमांतर्गत राज्यात मुलींची उत्कृष्ट पटनोंदणीही करण्यात आली.
निवड समितीमार्फत निकषप्राप्त प्रस्तावाची निवड करण्यात येऊन पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्यांची यादी घोषित करण्यात आली. तथा निवड झालेल्या प्राथमिक शिक्षकांना शाळेतील मुख्याध्यापकांमार्फत व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत १०० रुपये व प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश देण्यात आले. (प्रतिनिधी)

४५१ पुरस्कर्त्यांना ४५,१०० रुपयांचे ‘बक्षीस’
४जिल्ह्यातील १४ पंचायत समितीमधील ४३१ प्राथमिक शिक्षक आणि २० शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना प्रत्येकी १०० रुपयांप्रमाणे ४५ हजार १०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

४३१ प्राथमिक शिक्षक पुरस्कृत
४मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार योजनेंतर्गत ४३१ प्राथमिक शिक्षक आणि २० शिक्षण विस्तार अधिकारी पुरस्कारासाठी पात्र ठरले आहेत. यात अचलपूर पंचायत समितीमधील १८, अमरावती ४३, अंजनगावमधील १३, भातकुलीतून ११, चांदूरबाजार १, चिखलदरा ३०, चांदूररेल्वे ६०, दर्यापूर ४, धारणी ६, धामणगाव रेल्वे ४८, मोर्शी ५८, नांदगाव खंडेश्वर ४५, तिवसा व वरूड पंचायत समितीमधील प्रत्येकी ४३ असे एकूण ४३१ प्राथमिक शिक्षक व २० शिक्षण विस्तार अधिकारी पुरस्कृत होतील.

मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी करणाऱ्या प्राथमिक शिक्षक आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना १०० रुपयांचा भव्य पुरस्कार जाहीर झाला आहे. वाह रे शासन ! कार्यक्रम घेण्याचीही तसदी घेतली नाही.
- राजेश सावरकर, राज्य प्रसिद्धी प्रमुख, प्राथमिक शिक्षक समिती

Web Title: Girls' excellent screening, prize of 100 rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.