मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 09:55 PM2018-10-09T21:55:19+5:302018-10-09T21:55:37+5:30
तालूक्यातील झाडगाव येथे पांडुरंग बंडूजी राऊत (८५) यांचे वृद्धपकाळाने शनिवारी सायंकाळी निधन झाले. त्यांना पाच विवाहित मुली असून, त्या आपापल्या गांवी राहतात. पण, म्हातारे आइर्-वडील झाडगाव येथेच राहत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : तालूक्यातील झाडगाव येथे पांडुरंग बंडूजी राऊत (८५) यांचे वृद्धपकाळाने शनिवारी सायंकाळी निधन झाले. त्यांना पाच विवाहित मुली असून, त्या आपापल्या गांवी राहतात. पण, म्हातारे आइर्-वडील झाडगाव येथेच राहत होते. त्यांना मुलगा नसल्याने त्यांच्या पाचही मुली आईवडीलांना मुलाप्रमाणे कर्तव्य पार पाडत असताना त्यांना सर्व सुखसोई पुरवित होते. त्यामुळे म्हाताऱ्या आई-वडीलांना कधीच मुलाची उणीव भासू दिली नाही. वडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याची बातमी मुलींना कळताच त्या आपल्या संपूर्ण परिवारासह माहेरी आल्या. लाडक्या वडिलांच्या अंतिम संस्काराची तयारी केली. यावेळी समाजातील अंधरुढीला झुगारून आपल्या लाडक्या वडिलांच्या पार्थिवाला पाचही मुलींनी खांदा दिला.
पांडुरंगजी राऊत यांच्या पार्थिवावर गावातील स्मशानभूमीत रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मात्र मुलींनी मुलाचे कर्तव्य बजावत समाजाच्या अंधरुढीला झुगारून चार मुलींनी खांदा दिला. एका मुलीने आगट हाती घेतले होते. घरापासून तर स्मशानभूमीपर्यंत आपल्या वडिलांचे पार्थिव खांद्यावर घेऊन थेट शेवटचा अंतिम क्षण श्रद्धापूर्वक वडिलांच्या पार्थिवाला पाचही मुलींनी अग्नी दिला. त्यांनी समाजातील रुढी पंरपंरेचे बंधन झूगारुन मुलींनी समाजाला नवी प्रेरणा दिली तर त्यांच्या साथीला त्यांचे पतीदेव सुद्या उपस्थित होते.जगात दु:ख आहे. मृत्यू सत्य आहे. या दु:खाचे निवारण कसे करावे, यावर उपाय काय? याचा शोध आणि बोध घेऊन पुष्पा नागरकर,बेबिताई माडंवगडे,माया कोंडलकर, वंदूताई रामटेके, संगीता मारडकर या मुलींनी आपल्या वडिलांचा अंतिम संस्कार केला. त्यांच्या धाडसी कर्तबगारीने समाजाला एक नवी प्रेरणा व दिशा मिळाली. धन्य त्या मुली ज्यांनी वडिलांना मुलगा नसल्याने मुलींनी मुलाचे कर्तव्य पार पाडले. पांडूरंगजी राऊत यांच्या मागे पत्नी, पाच मुली, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.