तोकड्या कपड्यात थिरकतात मुली

By admin | Published: May 12, 2017 01:34 AM2017-05-12T01:34:33+5:302017-05-12T01:34:33+5:30

सैराट, झिंगाट अशी विशेषणेही उणी पडावीत, अशी मदमस्त झिंग, तोकड्या कपड्यांमधील मादक मुलींचे बेभान नृत्य

The girls who dance in a heavy clothes | तोकड्या कपड्यात थिरकतात मुली

तोकड्या कपड्यात थिरकतात मुली

Next

अंबानगरीत हे काय ? : अर्धनग्न मुलींच्या कमरेत हात अन् डीजेच्या तालावर नाच
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : सैराट, झिंगाट अशी विशेषणेही उणी पडावीत, अशी मदमस्त झिंग, तोकड्या कपड्यांमधील मादक मुलींचे बेभान नृत्य अन् मद्याचा कैफ थिटा पाडणारे हर तऱ्हेच्या हुक्क्याचे झुरके, हे दृश्य कुण्या डान्स बारमधील नव्हे तर सुसंस्कृत अंबानगरीच्या एका हुक्का पार्लरमधील आहे.
हो, हे खरे आहे. विशी-पंचवीशीतील तरूणाईला देहभान हरपून वेगळ्याच जगात झिंगलेल्या अवस्थेत बघायचे असेल तर बसस्थानक मार्गावरील ‘अड्डा -२७’ या हुक्का पार्लरचा एक फेरफटका पुरेसा ठरतो.
सध्याच्या तरूणाईचे नवे ‘स्ट्रेस किलर’ आणि ‘हबल-बबल’ अशी ओळख निर्माण करणाऱ्या या घातक हुक्का संस्कृतीने आता पावन अंबानगरीत प्रवेश केला आहे.
अलिकडेच पोलिसांनी टाकलेल्या धाडीत या हुक्का पार्लरमधील झुरके आणि ओंगळवाणा नृत्यप्रकार पद्धतशीरपणे दडपण्यात आला; तथापि ‘अड्डा -२७’मध्ये नेमके काय चालते, हे वास्तव उघड करणारी दृश्यफित ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.
कर्णकर्कश संगीताच्या तालावर बेधुंदपणे थिरकणाऱ्या तरूणी आणि बिनधास्तपणे हुक्क्याचे झुरके ओढून रंगीबेरंगी धूर सोडणारे तरूण या चित्रफितीत स्पष्ट दिसतात. हुक्क्याचा ‘कश’ ओढायचा अन् अर्धनग्न तरूणींच्या कंबरेत हात घालून नृत्य करायचे, असली संस्कृती या हुक्का पार्लरमध्ये जोपासली जात आहे.
अमरावतीची शालिन संस्कृती बाधित करणाऱ्या या मुद्याला एकट्या बजरंग दलाने हात घातला आहे. सत्तेत असलेला संस्कृती रक्षक भाजपक्ष आणि मराठी अस्मितेचा बाणा जपणारा शिवसेना पक्ष गप्पच आहे. हुक्का पार्लर चालविणारी मंडळी धनिक आहेत. सत्ताही सोबत असल्याचा त्यांचा दावा आहे. विरोधानंतरही असले पार्लर चालणार असतील तर ते दावे खरेच म्हटले पाहिजे.

शहरातील सहा
हुक्का पार्लर तूर्तास बंद
अड्डा २७- बसस्थानक रोड, मधुरम -गोपालनगर, कसबवा हुक्का बार -तपोवन, हॉट स्पॉट कॅफे-अंबादेवी रस्ता, वायफाय कॅफे -एमआयडीसी, फुड इन -राठीनगर या शहरातील सहा हुक्का पार्लर्सना पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी तूर्तास स्थगिती आदेश बजावले आहेत. पार्लर चालकांना हजर करण्याचे आदेशही सीपींनी दिले. बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सदर हुक्का पार्लर बंद करण्यासाठी निवेदन दिले होते. ‘लोकमत’ने हा विषय शोधक पद्धतीने लोकदरबारात मांडल्यानंतर शहर पोलिसांनी सदर मुद्याची गंभीर दखल घेतली आहे.

 

Web Title: The girls who dance in a heavy clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.