आयकराच्या नोटिसीला एका क्लिकने द्या उत्तर
By admin | Published: June 12, 2017 12:15 AM2017-06-12T00:15:45+5:302017-06-12T00:15:45+5:30
आयकर विभागाच्या नोटिसीला उत्तर देण्यासाठी आता या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. कारण, या नोटिसीला एका क्लिकने उत्तर देणे शक्य होणार आहे. हे काम आता आॅनलाइन होणार आहे.
सरासरीपेक्षा कमी पाऊस : गावकऱ्यांचा अंदाज
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : पावसाळ्यापूर्वी कावळ्यांनी त्यांची घरटी झाडांच्या शेंड्यावर बांधल्याने गावकऱ्यांच्या भाकितानुसार यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
कावळ्याचे घरटे झाडाच्या खालच्या भागात असल्यास समाधानकारक आणि झाडाच्या शेंड्यावर असल्यास सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो, असा गावकऱ्यांचा विश्वास आहे. आजही ग्रामीण भागात या गोष्टींवर विश्वास ठेवला जातो. हवामान खात्याने यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. परंतु खेडोपाडी मात्र हवामानाचा अंदाज वर्तविण्याची स्वतंत्र पद्धत असते. कावळ्याच्या घरट्याच्या उंचीवरून पावसाचा अंदाज वर्तविण्याची ही पद्धत बरीच लोकप्रिय आहे. हा अंदाज बऱ्याच अंशी खरा ठरत असल्याचे गावकरी सांगतात. गावाकडील लोकरिती आणि पशू-पक्ष्यांवरून वर्तविण्यात येणारा पावसाच्या अंदाजावर गावकऱ्यांचा बराच विश्वास आहे.
रोहिणी नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्यास मृग नक्षत्र मात्र कोरडे जाते, असाही ग्रामस्थांचा आजपर्यंतच्या अनुभवावरून विश्वास वाढला आहे.