कापूस बोनसचा लाभ सरसकट शेतकऱ्यांना द्या

By admin | Published: April 19, 2015 12:21 AM2015-04-19T00:21:55+5:302015-04-19T00:21:55+5:30

राज्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यासंदर्भात सध्या चर्चा होत असली तरीही अमरावतीसह विदर्भातील ...

Give the benefits of cotton bonuses to the whole of the farmers | कापूस बोनसचा लाभ सरसकट शेतकऱ्यांना द्या

कापूस बोनसचा लाभ सरसकट शेतकऱ्यांना द्या

Next

लक्षवेध : बोनसचा लाभ शेतकऱ्यांना की व्यापाऱ्यांना, वस्तुनिष्ठ तोडगा काढण्याची मागणी
अमरावती : राज्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यासंदर्भात सध्या चर्चा होत असली तरीही अमरावतीसह विदर्भातील बहुतांश अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आपला कापूस व्यापाऱ्यांनाच विकला आहे. आणि व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला कापूस पणन महासंघाला विकला आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादकांना बोनस देण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा सर्व फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. त्यापेक्षा कापूस उत्पादकांना सरसकट मदत करण्याच्या दृष्टिकोनातून वस्तुनिष्ठ तोडगा यावर काढावा, अशी मागणी होत आहे.
राज्यभरातील १ कोटी पेक्षा जास्त क्विंटल खरेदी केलेल्या कापसाला ३०० रुपये बोनस देण्याचा विचार झाला तरी ही रक्कम कोट्यवधीच्या घरात जाते. यापैकी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पदरात किती रक्कम पडणार, असा सवाल उपस्थित होत आहे. कापूस उत्पादनाच्या वेळी चांगले भाव दिले तर शेतकऱ्यांना त्वरित पैशांची मदत होते. शेतकऱ्यांना गावातून कापूस खरेदी केंद्रापर्यंत कापूस आणण्याचा खर्च सोसवत नाही. अशावेळी गावातील व्यापाऱ्याला कापूस विकला जातो. किंवा मोठा व्यापारी गावातच वाहन घेऊन जागेवर चुकारे देतात. त्यामुळे शेतकरी व्यापाऱ्यालाच कापूस विकतात. आलेला कापूस साठवून ठेवावा आणि चांगले भाव आल्यानंतर तो बाजारात विक्रीसाठी आणावा, अशी तयारी शेतकऱ्यांची नसते. तोपर्यंत त्यांना थांबताही येत नाही. त्यामुळे शेतातून घरी आणलेला कापूस थेट व्यापाऱ्यांच्या दारात नेऊन टाकावा लागतो. बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस व्यापाऱ्यांनाच विकला. शासनाकडे अशा शेतकऱ्यांचे प्रमाण कमी आहे. जो कापूस शेतकरी व्यापाऱ्यांना विकतात, अशा कापसाला शासनाने प्रतिक्विंटल काही बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना कदापिही होणार नाही. अशी शेतकऱ्यांची भावना आहे. राज्यातील १२६ कापूस खरेदी केंद्रावर १ कोटी ७ लाख ७२ हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. यातील पणन महासंघाने खरेदी केलेला कापूस २६ लक्ष ९४ हजार क्विंटल तर सीसीआयने खरेदी केलेला कापूस ८० लाख ७८ हजार क्विंटल आहे. शेतकरी व्यापाऱ्यांना कापूस विकत होते तेव्हा हा कापूस ३८०० ते ३९०० रुपये भावाने शेतकऱ्यांना विकावा लागला. अनेक व्यापाऱ्यांनी हाच कापूस पणन किंवा सीसीआयला घातला काही शेतकऱ्यांनी थेट पणन महासंघाच्या अथवा सीसीआयला आपला कापूस विकला असेल. पण अशा शेतकऱ्यांचे प्रमाण कमी आहे. कुठल्या ना कुठल्या व्यापाऱ्यामार्फत शेतकऱ्यांनी हा कापूस विकला आहे. त्यामुळे बोनस संदर्भात शासनाने निर्णय घेतल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (प्रतिनिधी)
शासनाने एकतर कापूस खरेदी कें द्र उशिरा सुरू केले अन् लवकरच बंदही केले. त्यामुळे या केंद्राचा शेतकऱ्यांना लाभ घेता आला नाही. अशातच दुष्काळ व गारपिटीने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देताना सरकट १० हजार रुपये शेतकऱ्यांच्याच खात्यावर जमा करावे.
- विजय विल्हेकर,
शेतकरी नेते.

Web Title: Give the benefits of cotton bonuses to the whole of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.