शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्या

By admin | Published: October 27, 2015 12:29 AM2015-10-27T00:29:25+5:302015-10-27T00:29:25+5:30

सोयाबीन, कापूस, तूर उत्पादकांना शासनाने दिवाळीपूर्वी प्रतिहेक्टर २५ हजार रूपये आर्थिक मदत द्यावी,...

Give compensation to farmers before Diwali | शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्या

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्या

Next

मागणी : युवा स्वाभिमानचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अमरावती : सोयाबीन, कापूस, तूर उत्पादकांना शासनाने दिवाळीपूर्वी प्रतिहेक्टर २५ हजार रूपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आ. रवी राणा यांच्या नेतुत्वात युवा स्वाभिमान संघटनेने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.
यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम व्यर्थ गेल्यामुळे नगदी सोयाबीनसह कापूस व तूर पिकेही धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. शासनाने शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता विनाविलंब दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची आर्थिक मदत दिवाळीपूर्वी देण्याची मागणी शासनाकडे केली आहे. जिल्हाधिकारी यांना सोयाबीन भेट देऊन आंदोलनकर्त्यांनी समस्यकडे लक्ष वेधले. यावेळी जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, सिध्दार्थ बनसोड, संजय हिंगासपुरे, उमेश ढोणे, ज्योती सैरीसे, सुमती ढोके, अनुप अग्रवाल, रौनक किटूकले, शैलेश कस्तुरे, अजय बोबडे व पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Give compensation to farmers before Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.