आशा वर्करला रोजचा ३०० रुपये भत्ता द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:13 AM2021-05-12T04:13:34+5:302021-05-12T04:13:34+5:30

अमरावती : कोरोनाकाळात आशा वर्करची भूमिका फार महत्त्वाची आहे. जिवावर उदार होऊन रोज कामे करीत असल्याने या कर्मचाऱ्यांना किमान ...

Give daily allowance of Rs. 300 to Asha worker | आशा वर्करला रोजचा ३०० रुपये भत्ता द्या

आशा वर्करला रोजचा ३०० रुपये भत्ता द्या

Next

अमरावती : कोरोनाकाळात आशा वर्करची भूमिका फार महत्त्वाची आहे. जिवावर उदार होऊन रोज कामे करीत असल्याने या कर्मचाऱ्यांना किमान ३०० रुपये भत्ता देण्याची मागणी भीम ब्रिगेडने महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे केली.

सद्यस्थितीत आशा वर्कर यांची नेमणूक लसीकरण केंद्रांवर करण्यात आलेली आहे. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंदणी, ज्येष्ठ नागरिकांना आधार देऊन लसीकरणासाठी आणणे, वेळ असल्यास बसावयास लावणे ही कामे करीत सकाळी ९ ला आलेली आशा वर्कर सायंकाळी ७ वाजता घरी जाते. त्यांच्या जोडीला असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्यात येत आहे. एएनएम यांना ५०० रुपये रोज व संगणक ऑपरेटरला ३९० रुपये दैनंदिन भत्ता असताना आशा वर्कर अल्पसे मानधन घेतात. त्यामुळे त्यांना रोजचे किमान ३०० रुपये देण्यात यावे, असी मागणी भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे यांनी निवेदनाद्वारे केली.

Web Title: Give daily allowance of Rs. 300 to Asha worker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.