दिव्यांगांना हजार रुपये महिना द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2017 12:11 AM2017-06-27T00:11:46+5:302017-06-27T00:11:46+5:30
देशभरातील दिव्यांग बांधवांना विविध शासकीय सुविधा मिळविण्यासाठी आंदोलन केले.
बच्चू कडूंची मागणी : आॅगस्टनंतर आंदोलनाचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : देशभरातील दिव्यांग बांधवांना विविध शासकीय सुविधा मिळविण्यासाठी आंदोलन केले. मात्र त्यांना आता हजार रुपये प्रतिमहिना देण्याची मागणी केली असून शासनाने ती मान्य न केल्यास १ आॅगस्टपासून रेल रोको आंदोलनासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तयार राहवे, असे आवाहन अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी केले.
येथील संत गाडगे महाराज पाणेरीमध्ये आयोजित आई इंदिरा कडू यांच्या ७५ व्या वादिवसानिमित्त आयोजित अपंग सेवायज्ञ कार्यक्रम पार पडले. यावेळी बाजार समितीचे संचालक सतीश व्यास, बल्लू जवंजाळ, गजानन भोरे, शेळके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
अपंगांसाठी मोठे आंदोलन उभारून २८ पेक्षा जास्त जीआर काढल्यानंतर त्यांना शासनाच्या घरकुल, संजय गांधी निराधार योजना, रेशन, एसटी पास, आरोग्य शिक्षण व इतर सर्वच योजनांचा लाभ मिळावा, यासाठी या शिबिराच्या माध्यमातून अचलपूर तालुक्यातील शेकडो गोरगरीब अपंगांना विविध दाखल्यांचे वाटप यावेळी करण्यात आले व विधी शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला आहे.
देशातील पहिल्या अपंग विम्याचे अर्ज वाटप
बच्चू कडू यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात हजारो अपंग बांधवांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. यावेळी देशात पहिल्यांदा अचलपूर येथे अपंगांसाठी शासनाची ‘अपंग विमा योजना’ सुरू झाली. या योजनेचे अर्ज वाटक करून कागदपत्र गोळा करण्याचे आवाहन करण्यात आले. या विमा योजनेत अपंगांसोबत घरातील चार सदस्यांचा आरोग्याचा खर्च विमा योजनेतून उचलण्यात येणार आहे. १८ ते ६० वर्षे वयोगटातील अपंग व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.