संत्रा उत्पादकांना वाढीव पीककर्ज द्या

By admin | Published: June 21, 2017 12:16 AM2017-06-21T00:16:59+5:302017-06-21T00:16:59+5:30

पीककर्जाचे दर संत्रा बागायतदारांना वाढवून देण्यात यावे, अशी मागणी प्रहारचे संस्थापक व आ. बच्चू कडू यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे एका निवेदनातून सोमवारी केली आहे.

Give increased crop yield to orange growers | संत्रा उत्पादकांना वाढीव पीककर्ज द्या

संत्रा उत्पादकांना वाढीव पीककर्ज द्या

Next

बच्चू कडूंची मागणी : संत्रा लागवड कठीणच
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : पीककर्जाचे दर संत्रा बागायतदारांना वाढवून देण्यात यावे, अशी मागणी प्रहारचे संस्थापक व आ. बच्चू कडू यांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे एका निवेदनातून सोमवारी केली आहे.
मोर्शी-वरूड तालुका हा संत्र्याचा कॅलीफोर्निया म्हणून संबोधले जाते. तसेच चांदूरबाजार व परतवाडा तालुक्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर संत्रा उत्पादन घेण्यात येत असल्यामुळे व संत्रा उत्पादनाचा खर्चही दिवसेंदिवस वाढत चालला असून बँकांमार्फत शेतकऱ्यांना प्रतिझाड ३१० रुपये कर्जपुरवठा करीत असल्याने एवढ्या कमी रकमेत संत्रा लागवड करणे कठीणच झाले आहे.
प्रत्येक संत्रा झाडावर अंदाजे १००० ते ३००० संत्रा फळे येत असतात आणि बाजारभावानुसार प्रत्येक फळ ३ ते ५ रुपये असल्याने अंदाज ३ ते ५ हजार रुपये जास्तीत जास्त ९ ते १५ हजार इतके उत्पादन मिळते. हे प्रमाण पाहता बँकांचे कर्जपुरवठ्याचे दर अत्यल्प असून संत्रा पीक कर्जाचे दर वाढवून देण्यात यावे, अशी मागणी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्यावतीने आ.बच्चू कडू यांच्यातर्फे करण्यात आली आहे. यावेळी प्रहारचे अनिल खांडेकर, नईमखान, गजानन काळे, गजानन धनसांडे इत्यादी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Give increased crop yield to orange growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.