प्राथमिक शिक्षकांना कोविड प्रतिबंधकात्मक लस द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:13 AM2021-03-24T04:13:09+5:302021-03-24T04:13:09+5:30
अमरावती : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणकांनाही कोरोना लसीकरणाचा सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी ...
अमरावती : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणकांनाही कोरोना लसीकरणाचा सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सद्यस्थितीत आरोग्य कर्मचारी, महसूल विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी आदींना शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी लसीकरण होत आहे. कोरोनाकाळात वर्षभरापासून प्राथमिक शिक्षकही जिल्हा प्रशासनासोबत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी विविध ठिकाणी कर्तव्य बजावत आहेत. यामुळे यावर योग्य निर्णय घेऊन कोरोना लसीकरणाचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत, सरचिटणीस संभाजी रेवाळे, जिल्हा कोषाध्यक्ष मनीष काळे, राज्य प्रतिनिधी राजेश सावरकर, महिला आघाडीप्रमुख सरीता काठोळे, सरचिटणीस योगिता जिरापुरे, कार्याध्यक्ष सुषमा वानखडे, कोषाध्यक्ष भावना ठाकरे आदींनी केली आहे.