मला तुमचे पाच दिवस द्या, मी सतत पाच वर्षे सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 11:11 AM2024-11-06T11:11:26+5:302024-11-06T11:14:36+5:30

रवी राणा यांचे मतदारांना भावनिक आवाहन; मुख्य प्रचार कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन

Give me your five days, I will serve you continuously for five years | मला तुमचे पाच दिवस द्या, मी सतत पाच वर्षे सेवेत

Give me your five days, I will serve you continuously for five years

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
मत विभाजन करून फक्त पाडण्यासाठी उभे असणारे लोक ओळखा. जनतेने लोकसभेत खासदार गमावला. जिल्हा १५ वर्षे मागे गेला. पण ही चूक पुन्हा करू नका. मला तुमचे पाच दिवस द्या, मी सतत पाच वर्ष सेवेत राहणार, असे भावनिक आवाहन बडनेरा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रवी राणा यांनी सोमवारी येथे केले.


भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं आठवले, पिरिपा कवाडे, लहूजी शक्ती सेना, शेतकरी संघटना महायुतीचे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांच्या मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी समर्थवाडीचे सोपान महाराज फिरके यांच्या हस्ते पार पडले. बडनेरा मतदारसंघातील मध्यवर्ती गोपालनगर येथे मुख्य प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी हजारो मातृ-पितृ, युवा वर्ग रवी राणा यांना आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या उत्साहात उपस्थित होते. कार्यक्रमात रवी राणा यांनी सर्व उपस्थित हजारो वयोवृद्ध नागरिकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करत त्यांचा आशीर्वाद घेतला. 


या दिमाखदार सोहळ्यात महायुतीचे उमेदवार रवी राणा यांनी माझ्यासाठी फक्त पाच दिवस द्या, मी आपल्यासाठी संपूर्ण पाच वर्ष देईल, असे अभिवचन दिले. काही लोक फक्त माझा पराभव करण्यासाठी मैदानात आहे. मत विभाजनामुळे लोकसभा निवडणुकीत काय झाले? हे मी काही सांगण्याची गरज नाही. नवनीत राणा खासदार असताना यांनी लोकसभेत अमरावती जिल्ह्याचा सन्मान वाढवला. त्यांच्या पुढाकाराने प्रथमतः संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वाढवून देण्यात आले. त्यांच्या प्रयत्नांमुळे बडनेरा विधानसभा मतदारसंघात १,६०० कोटींच्या निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साकारले जात आहे. यात भाजपचे नेते किरण पातुरकर यांचादेखील मोठा वाटा असल्याची कबुली आमदार रवी राणा यांनी दिली. 


या सोहळ्याला समर्थवाडीचे महाराज सोपान भाऊसाहेब फिरके, आत्माराम पटेल, माजी आमदार डॉ. श्रीकांत देशपांडे, किरण पातुरकर, किरण महल्ले, सुनील काळे, रवींद्र खांडेकर, नीळकंठ कात्रे, जयंतराव वानखडे, शैलेंद्र कस्तुरे, गणेश खारकर, अॅड. नंदेश अंबाडकर, चरणदास इंगोले, डॉ. श्रीराम कोल्हे, श्रीराम माहोरे, चंद्रकांत गुल्हाने, पुरुषोत्तम बनसोड, सुधाकर शेंदोरकर, सोपान महाराज फिरके, निळकंठ सतीश गावंडे, सुमती ढोके, नंदू हरणे, गणेशदास गायकवाड, किरण अंबाडकर, रवी हिवरकर, सुरेश यावले, ओमप्रकाश अंबाडकर, मुकेश उसरे, शिवदास घुले, राजू कुरील, सुखदेव तरडेजा, चंदा लांडे, संजय तिरथकर, विनय घिमे, जाधव घटाले, संध्या टिकले, डॉ. रूपेश खडसे, पंकज जाधव, विनोद कलंत्री, अतकरे साहेब, तालन ताई, विजया घोडेस्वार, संजय माहुलकर, संजय हिंगासपुरे, आदी अतिथी म्हणून उपस्थित होते. 


राणा किराणा-साड्या वाटते, तुमच्या पोटात का दुखते
नवनीत राणा आमचे विरोधक नेहमी आरडाओरड करतात, रवी राणा किराणा वाटते. साड्या वाटते. मग तुम्ही का बरं हे धाडस करत नाही? अरे माझे तुम्हाला चॅलेज आहे किमान दोन किलो साखर तरी घरोघरी वाढून दाखवा. साड्या नाही तर किमान एक ब्लाऊज पिस तर वितरित करण्यासाठी पुढाकार घेऊन दाखवा, असा टोला विरोधकांना माजी खासदार नवनीत राणा लगावला.

Web Title: Give me your five days, I will serve you continuously for five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.