विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 10:35 PM2018-01-02T22:35:13+5:302018-01-02T22:35:41+5:30
देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शेती व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले,....
आॅनलाईन लोकमत
अमरावती : देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शेती व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले, अशा थोर पुरूषाचे नाव बेलोरा विमानतळाला देण्यात यावे, पूर्णाकृती पुतळा उभारावा, तसेच भारतरत्न द्यावे. या मागण्यासाठी मंगळवारी शहर काँग्रेस, मराठा सेवासंघ, भारत कृषक समाजाच्यावतीने आरडीसी नितीन व्यवहारे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
भाऊसाहेबांनी नावलौकिक कार्याची दखल घेऊन शहर काँग्रसेचे अध्यक्ष किशोर बोरकर यांच्या मार्गदर्शनात २७ डिसेंबर रोजी शहर जिल्हा काँग्रेसने वरील मागण्यांविषयी ठराव पारित केले होते. राज्यातील तमाम भावना लक्षात घेता शासन दरबारी पोहोचविण्यासाठी शहर काँग्रेस कमिटी, मराठा सेवा संघ, भारत कृषक समाजाने याकडे शासनाचे लक्ष वेधले. दरम्यान या मागणीसंदर्भात किशोर बोरकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मोहिते, भारत कृषक समाजाच्या शहराध्यक्ष मयुरा देशमुख, माजी कुलगुरू गणेश पाटील, मनपा गटनेता बबलू शेखावत आदींनी या मुद्यावर विचार मांडले. सोबतच भीमा कोरेगाव येथे समाजकंटकाकडून झालेली दगडफेक व जाळपोळीचा व केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी संविधानावर केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर, चंद्रकात मोहिते, मयुरा देशमुख, बबलू शेखावत, विलास इंगोले, भैय्या पवार, सुरेश रतावा, पुरूषोत्तम मुंदडा, गणेश पाटील, प्रल्हाद ठाकरे, प्रशांत डवरे, सुधाकर तलवारे, एकनाथ गावंडे, बी.आर देशमुख, अभिनंदन पेंढारी, नसीम खान, किशोर रायबोले, अनिल माधोगडीया, भैय्यासाहेब निचळ, सत्यप्रकाश गुप्ता, अर्चना सवाई, वृषाली वाकोडे, कल्पना वानखडे, मनाली तायडे, शीला पाटील, तेजस्विनी वानखडे, प्रतिभा रोडे, करीमा बाजी, शोभा शिंदे, राजेश चव्हाण, दिपलसिंग सलुजा, आनंद भामोरे, मो सादिक सौदागर, देवयानी कुर्वे, राजीव भेले, उज्ज्वला पांडे, राजेश देशमुख, ज्ञानेश्र्वर कुर्वे, संजय बोबडे,राहूल येवले आदी उपस्थित होते.
लोकांच्या भावनेशी निगडित विषय
शिक्षण महर्षी, भारतीय कृषी क्रांतीचे जनक, भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे कार्यकर्तृत्व सर्वश्रृत आहे. त्यामुळे बेलोरा विमातळाला भाऊसाहेबांचे नाव, भारतरत्न देण्याची मागणी महाराष्ट्रातील सर्व लोकांच्या भावनेशी निगडित आहे. त्यामुळे यावर शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे. ही मागणी गांधीवादी मार्गाने केली जात आहे. यासाठी आंदोलनाची वेळ येऊ नये, असा आशावादही उपस्थितांनी व्यक्त केला.