तूर खरेदीचे पैसे २४ तासात द्या
By admin | Published: May 18, 2017 12:19 AM2017-05-18T00:19:11+5:302017-05-18T00:19:11+5:30
नाफेड मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या तूरीचे चुकारे २४ तासाच्या आत शेतकऱ्यांना देण्यात यावे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नाफेड मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या तूरीचे चुकारे २४ तासाच्या आत शेतकऱ्यांना देण्यात यावे यासह अन्य मागण्यासाठी बुधवारी प्रहारच्या वतीने निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांची तूर खरेदी नाफेड मार्फत केल्यानंतर याचा मोबदला हा धनादेशाव्दारे दिला जात आहे. मात्र सदर धनादेश हा संबंधित बँकेत जमा केल्यावरही महिनाभऱ्यानंतरही रक्कम मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना तूर खरेदीचा मोबदला हा २४ तासाच्या आत शेतकऱ्यांना देण्यात यावा, कांदा खरेदी केंद्र सुरू करावे, प्रतिक्विंटल ८०० रूपये बोनस देण्यात यावे, शेतकऱ्यांना पिक कर्जातून बँक खात्यात असलेली रोख रक्कम देण्यात यावी, अन्यथा प्रहारच्यावतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, मंगेश देशमुख, राजेंद्र गायकी, नंदकिशोर विधळे आदिंनी दिला.