जिल्हा परिषदेचा यशवंत पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 10:42 PM2018-10-26T22:42:11+5:302018-10-26T22:42:39+5:30

पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतींसाठी राज्य स्तरावर यशवंत पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे.

Given the Yashwant award of Zilla Parishad | जिल्हा परिषदेचा यशवंत पुरस्काराने गौरव

जिल्हा परिषदेचा यशवंत पुरस्काराने गौरव

Next
ठळक मुद्देयशवंत पंचायतराज : राज्यपाल, ग्रामविकासमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पंचायत राज संस्थांचे व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायतींसाठी राज्य स्तरावर यशवंत पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात स्थानिक जिल्हा परिषदेने २०१६-१७ या वर्षात केलेल्या कामांची ही तपासणी राज्यस्तरीय केली होती.
यशवंत पंचायतराज अभियानात राज्यात अमरावती जिल्हा परिषदेने तृतीय पुरस्कार पटकाविला आहे. याशिवाय विभागात अचलपूर पंचायत समिती प्रथम व चांदूर रेल्वे पंचायत समिती व्दितीय क्रमांक पटकाविला आहे. राज्यस्तरीय गौरव सोहळा शुक्रवार २६ आॅक्टोंबर रोजी मुंबई येथील रवींद्र नाटय मंदीर येथे पार पडला. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते व ग्रामविकास मंत्री पकंजा मुंडे, ग्रामविकास विभागाचे सचिव व अन्य मान्यवरांचे हस्ते जिल्हा परिषदेला १५ लाखांचा तृतीय पुरस्कार व प्रशस्तीपत्र देवून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे तसेच माजी अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे , सदस्य सारंग खोडस्कर व मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके,प्रकल्प संचालक आनंद भंडारी आदीचा गौरव करण्यात आला.
या अभियानात जिल्हा परिषदेने २०१६-१७ या वर्षात केलेल्या कामांची ही तपासणी केली होती. या कालावधीतील सामान्य प्रशासन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग, स्वच्छ भारत अभियान यांचा त्यात समावेश होता.तसेच २०१६-१७ या कालावधीत जिल्हा परिषदेच्या विविध विभागात केलेले संगणकीकरण, शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या, पंतप्रधान आवास योजना, दिव्यांग अभियान,स्वच्छता अभियान यासारख्या योजनामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.यासर्व नाविण्यपूर्ण उपक्रमाची फलश्रृती म्हणून जिल्हा परिषदेने यशवंत पंचायतराज अभियानात राज्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे.त्यामुळेच राज्यात जिल्हा परिषदेला हा सन्मान मिळाला असल्याच्या प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे आजी-माजी पदाधिकारी व अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Given the Yashwant award of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.