चालत्या शिवशाही बसची काच अचानक फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 06:00 AM2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:47+5:30
अमरावती-परतवाडा मार्गावर मेघनाथपूर फाट्याच्या पुढे बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दरम्यान शिवाशाही बसची पुढील काच हवेच्या दाबाने अचानक फुटली. फुटलेल्या काचेचे तुकडे ड्रायव्हरच्या अंगावर तसेच केबिनमध्ये विखुरले गेलेत. काचेचा मोठा तुकडा विरुद्ध दिशेने अष्टमासिद्धीकडे जाणाऱ्या वाहनावर पडल्याने त्याची काचदेखील फुटली.
परतवाडा : अमरावती-परतवाडा मार्गावर मेघनाथपूर फाट्याच्या पुढे बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास दरम्यान शिवाशाही बसची पुढील काच हवेच्या दाबाने अचानक फुटली. फुटलेल्या काचेचे तुकडे ड्रायव्हरच्या अंगावर तसेच केबिनमध्ये विखुरले गेलेत. काचेचा मोठा तुकडा विरुद्ध दिशेने अष्टमासिद्धीकडे जाणाऱ्या वाहनावर पडल्याने त्याची काचदेखील फुटली.
परतवाडा आगाराची शिवशाही बस (एम.एच.०९ ई एम १६३२) बुधवारी सकाळी १०.१५ वाजता अमरावतीकडे जाण्यास निघाली होती. बसमध्ये काचा वेगाने सर्वत्र उडाल्या असल्या तरी कुणालाही गंभीर इजा झाली नाही. ड्रायव्हरच्या शरीराला घासून गेल्याने किरकोळ इजा झाली. विनावाहक, विनाथांबा असलेल्या या बसमधील प्रवाशांना नंतर चालकाने दुसऱ्या बसने अमरावतीला रवाना केले. अन्य काच फुटलेल्या वाहनातील प्रवाशांनाही इजा झाली नाही.
काही महिन्यांपूर्वी भूगावलगत एका शिवशाही बसने पेट घेतला होता, तर काही दिवसांपूर्वी भूगाव-मेघनाथपूर-आसेगाव दरम्यान दुसºया एका शिवशाही बसमधून मागील बाजूस धूर निघत होता.