‘जीएम’ची विंडो पाहणी
By admin | Published: April 25, 2017 12:09 AM2017-04-25T00:09:04+5:302017-04-25T00:09:04+5:30
मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी गितांजली एक्सप्रेसला जोडून असणाऱ्या निरीक्षण यानमधून नागपूर ते मुंबई दरम्यान रविवारी विन्डो इन्स्पेक्शन केले.
वार्षिक दौरा : नागपूर-मुंबई रेल्वे ट्रॅक तपासणी
बडनेरा : मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी गितांजली एक्सप्रेसला जोडून असणाऱ्या निरीक्षण यानमधून नागपूर ते मुंबई दरम्यान रविवारी विन्डो इन्स्पेक्शन केले. दरम्यान बडनेरा रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यात आली. यावेळी भुसावळ मध्य रेल्वेच्या प्रबंधकांनी त्यांचे स्वागत केले.
महाप्रबंधक डी.के.शर्मा यांचे निरीक्षण यान गितांजली एक्सप्रेसला जोडून होते. नागपूर येथून त्यांचे विन्डो इन्स्पेक्शन सुरु झाले. दुपारी ११ वाजता गितांजली एक्सप्रेस बडनेऱ्यात दाखल झाली. यावेळेस भुसावळ मध्य रेल्वेचे प्रबंधक आर.के.यादव व बडनेरा रेल्वेचे स्टेशन मॅनेजर आर.डब्ल्यू. निशाने यांनी निरीक्षण यानमध्ये जाऊन महाप्रबंधक शर्मा यांचे स्वागत केले. महाप्रबंधक ज्या डब्यातून विन्डो इन्स्पेक्शन करीत होते, ते निरीक्षण यान गितांजली एक्सप्रेसला शेवटी जोडण्यात आले होते. त्यातून त्यांनी नागपूर रेल्वे स्थानकापासून ते मुंबई पर्यंत निरीक्षण केल्याची माहिती आहे. यात ट्रॅकची तपासणी स्टेशनची पाहणी, परिसर, ओवरहेड वायरिंग, दरम्यान लागणारे रेल्वे फाटक कर्मचारी कुठे-कुठे कार्यरत आहे. या सह सर्वच प्रकारचे निरीक्षण केले. विन्डो इन्स्पेक्शन करताना त्यांच्यासोबत रेल्वेच्या विभागातील प्रमुख विभागाचे अधिकारी, तांत्रिक अधिकाऱ्यांची चमू सोबत होती. तपासणी करताना अधिकाऱ्यांना ‘जीएम’कडून विचारणा देखील केली जाते. एकूणच रेल्वे व प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महाप्रबंधकांचे विन्डो इन्स्पेक्शन होत असते. महाप्रबंधकांच्या दौऱ्यादरम्यान रेल्वे रुळाच्या उणिवा, स्वयंचलित सिग्नल प्रणाली, पुलाचे बांधकाम, रेल्वे गेट आदींबाबत सूक्ष्म निरीक्षण केले जाते. तांत्रिक बाबीदेखील तपासल्या जातात. (शहर प्रतिनिधी)
भुसावळ डीआरएमकडून बडनेरा स्थानकाची पाहणी
प्रबंधक आर. के. यादव हे नव्यानेच या पदावर रुजू झाले. त्यांचा बडनेरा रेल्वे स्थानक पाहणीचा हा पहिलाच दौरा होता. महाप्रबंधक येण्याआधी त्यांनी बडनेरा रलेल्वे स्थानकावरील रनिंग रुम, प्लॅटफार्म , खानावळ, आॅटो व बस स्टॅँड तसेच टिकिटघर, आर.आर. कॅबीनची पाहणी केली. दरम्यान रनिंग रुममध्ये शौचालय, स्रानगृह, ध्यानकक्ष, विश्रामगृह, चालकांच्या खोल्यांची पाहणी केली. अडी-अडचणी विचारल्या. यावेळेस स्टेशन प्रबंधक आर.डब्ल्यु. निशाणे, अधिकारी ए. के. सिंग, एच. के. शर्मा, एस. एस. येणकर, वाणिज्य निरीक्षक एस. सी. सयाम, व्ही. डी. कुंभारे, किशोर लोहबरे, मुख्य तिकिट पर्यवेक्षक वकील खान, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक एस. सी. पटेल, रेल पथ निरीक्षक वाडेकर, आय. डब्ल्युचे वासेकर यासह इतरही रेल्वेचे अधिकारी होते.