देशभरातील संशोधकांनी उघडले नवे ज्ञानदालन !

By admin | Published: January 31, 2015 11:12 PM2015-01-31T23:12:29+5:302015-01-31T23:12:29+5:30

मानवी जीवनात लाभदायी ठरणाऱ्या देशभरातील पर्यावरणपूरक संशोधनांची जत्राच जणू अमरावतीच्या मातीत अनुभवता आली. ब्रजलाल बियाणी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाने आयोजित

Gnanadalan opened by researchers across the country! | देशभरातील संशोधकांनी उघडले नवे ज्ञानदालन !

देशभरातील संशोधकांनी उघडले नवे ज्ञानदालन !

Next

वैभव बाबरेकर - अमरावती
मानवी जीवनात लाभदायी ठरणाऱ्या देशभरातील पर्यावरणपूरक संशोधनांची जत्राच जणू अमरावतीच्या मातीत अनुभवता आली.
ब्रजलाल बियाणी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत बुद्धीला आव्हान देणारी अनेक संशोधने सामान्यजनांसाठी सादर करण्यात आलीत. देशभरातील विविध राज्यांतून २१६ संशोधकांनी विज्ञानाचे विविध अविष्कार अंबानगरीत उलगडून दाखविले.
३० जानेवारी रोजी राष्ट्रीय परिषेदेचे उद्घाटन सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु एन.एन.मालदार यांनी केले. दोन दिवस चाललेल्या या परिषदेला देशभरातील ९ राज्यांतून २१६ संशोधकांनी उपस्थिती दर्शविली. त्यापैकी १७२ संशोधकांनी रासायनिक प्रक्रियेवर आधारीत संशोधनांचे सादरीकरण केले. मानवी जीवनासाठी उपयोगी पडणारे पर्यावरणपूरक संशोधन दर्जेदार व स्वस्त किमतीत मानवाच्या कामी पडणारे आहे. मानवी जीवनातील अडीअडचणी लक्षात घेता संशोधकांनी तयार केलेली स्वस्त व दर्जेदार औषधीही यावेळी सादर करण्यात आलीत. ३५ वर्षांखालील वयोगटातील १६ विद्यार्थ्यांनी संशोधनाचे 'ओरल प्रेझेंनटेशन' केले.
शनिवारी सकाळच्या सत्रात मुंबई येथील आयआयटीमधील संशोधक अरिधम चौधरी, लखनौचे अभिनव कुमार, दिल्लीचे प्रवीण इंगोले, वाराणसी येथील बनारस हिन्दू विद्यापीठातील वरिष्ठ संशोधक सेन गुप्ता व अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठाचे के.एस.चिखालीया यांनी आपापल्या विभागातील अविष्कारांचे सादरीकरण केले. २१० संशोधकांनी पोस्टरचे प्रदर्शन केले. देशभरातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या संशोधनकार्यामुळे अंबानगरीतील जिज्ञासू तरुणांना नवी उर्जा प्राप्त झाली.

Web Title: Gnanadalan opened by researchers across the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.