‘ज्ञानमाता’चा ओम हवाई सफरीवर

By admin | Published: June 21, 2017 12:14 AM2017-06-21T00:14:52+5:302017-06-21T00:14:52+5:30

येथील ज्ञानमाता हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या ओम संदीप सोनटक्के या विद्यार्थ्याला ‘लोकमत संस्काराचे मोती’ या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे ...

'Gnanmata' oh air travel | ‘ज्ञानमाता’चा ओम हवाई सफरीवर

‘ज्ञानमाता’चा ओम हवाई सफरीवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : येथील ज्ञानमाता हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या ओम संदीप सोनटक्के या विद्यार्थ्याला ‘लोकमत संस्काराचे मोती’ या स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे दिल्ली हवाई सफर करण्याची संधी प्राप्त झाली असून, यासाठी ओम बुधवारी पहिल्यांदाच विमानात बसून हवाई सफर करणार आहे.
‘लोकमत’च्यावतीने शालेय विद्यार्थ्यांनी "संस्काराचे मोती" या सदरात विद्यार्थ्यांना परिपाठ, ज्ञान विज्ञान, इतिहास व इतर माहिती दिली जाते. यावर आधारित स्पर्धेतून भरघोस बक्षिसांचे वितरण करण्यात येते. या योजनेत जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याला हवाई सफरीचा मान मिळत असतो. तो मान यंदा ओम सोनटक्के याला मिळाला आहे. दिल्लीमध्ये नेहरू तारा मंडल. इंदिरा गांधी स्मृतीभवन, महात्मा गांधी स्मृती भवन व राष्ट्रपती भवनाला भेट देणार आहे. त्यासोबतच केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट विद्यार्थी घेणार आहे. सोबतच उपराष्ट्रपती मोहम्मद हमिद अन्सारी यांनाही हे विद्यार्थी भेटणार आहेत. त्याच्या या निवडीबद्दल ज्ञानमाता हायस्कूलचे मुख्याध्यापक आरोक्य सामी यांनी अभिनंदन केले आहे.
लहानपणापासूून आकाशात उंचावरून उडणारे विमान पाहत असताना एक दिवस आपल्यालाही यात बसून प्रवास करायचाच असे स्वप्न पाहत होतो, ते आता लोकमतने साकार करून दिले आहे, असे ओम लोकमतशी बोलताना म्हणाला.

Web Title: 'Gnanmata' oh air travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.