अतिवृष्टी झेलणाऱ्या सोयाबीन उत्पादकांचे देव पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:11 AM2021-09-13T04:11:35+5:302021-09-13T04:11:35+5:30

अमरावती : पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती, अशा गच्च दाटलेल्या सोयाबीन पिकाची पाच दिवसांच्या अतिवृष्टीने दाणादाण उडविली. परिपक्व होण्याइतपत ...

God of soybean growers in the water | अतिवृष्टी झेलणाऱ्या सोयाबीन उत्पादकांचे देव पाण्यात

अतिवृष्टी झेलणाऱ्या सोयाबीन उत्पादकांचे देव पाण्यात

Next

अमरावती : पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती, अशा गच्च दाटलेल्या सोयाबीन पिकाची पाच दिवसांच्या अतिवृष्टीने दाणादाण उडविली. परिपक्व होण्याइतपत भरलेल्या शेंगांचे पावसाने फोलपट उडाले. त्यामुळे पीक हाती येईल की नाही, अशी स्थिती झाली असल्याचे अतिवृष्टीचा मार झेलणाऱ्या शेतकऱ्यांची झाली आहे.

चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, अमरावती, भातकुली, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, अंजनगाव सुर्जी या सात तालुक्यांमध्ये पाच दिवसांपासून वेगवेगळ्या महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद होत आहे. या तालुक्यांमध्ये बहुतांश शेतकरी सोयाबीन व तुरीचे उत्पादन घेतात. सोयाबीनला आता फुलोर झडून शेंगा धरल्या व त्या परिपक्व होत आहेत. लवकर तयार होणाऱ्या सोयाबीन वाणाला तर शेंगा तोडणीस येण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी पुरेसा आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना पाऊस नको असताना तो सातत्याने रात्री फेर धरत आहे. परिणामी शेंगांचे फोलपट उडाले आहे. काही ठिकाणी दाणा बारीक होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना उत्पादनात बसणार आहे. एवढेच नव्हे तर पावसामुळे जमिनीत पाय टाकताच चिखल होत असल्याने सोंगणीलाही बरेच दिवसांचा कालावधी द्याला लागणार आहे, तोपर्यंत पाऊस या पिकाची दाणादाण उडविणार आहे.

------------

मजुरांची चणचण

झपाट्याने शहरीकरणाकडे वळलेल्या ग्रामीण भागात आता मजुरांची चणचण आहे. त्यातच कोरोनामुळे शहरातून परतलेल्या तरुणांचे टोळके आपआपल्या थोड्याथोडक्या जमिनींमध्ये परिश्रम घेत आहेत. त्यामुळे जादा दर देऊनही मजूर मिळत नसल्याची व्यथा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

------------

हळदीलाही फटका

जिल्ह्यातील शेतकरी सर्वोत्कृष्ट दरामुळे हळद उत्पादनाकडे वळले आहेत. या पिकालाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे. सरीतील पाणी मुळाशी साचल्याने ती कुजण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. त्यामुळत्पाऊस न थांबल्यास हळद उत्पादनाला फटका बसेल, असे येरड बाजार येथील शेतकरी भूषण देशमुख यांनी सांगितले.

---------------

पहिल्यांदा कीटकनाशकाचा कमी मारा

अतिवृष्टीचा मारा न झालेल्या यंदा पहिल्यांदा कीटकनाशकाचा कमी मारा केल्यानंतरही भरघोस उत्पादन शेतकऱ्यांना घेता येणार आहे. आठ दिवसांत सोयाबीनचे उत्पादन घरी येईल, तेही किमान कीटकनाशकाच्या वापरावर, असे पिंप्री निपाणी येथील शेतकरी अशोक डोंगरे यांनी सांगितले.

--------------

दुबार पेरणी अशक्य

अमरावती तालुक्यात आठवड्याच्या सुरुवातीला सलग तीन दिवस अतिवृष्टी झाली. पेढी नदी कोपली. पुराचे पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन हातचे गेले आहे. आता दुबार पेरणीची वेळही राहिलेली नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी हतबल झाल्याची प्रतिक्रिया रोहणखेड पर्वतापूर येथील शेतकरी सुधीर तायडे यांनी व्यक्त केली.

Web Title: God of soybean growers in the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.