विनापरवानगी कोविड रूग्णालयात जावून डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:14 AM2021-04-08T04:14:30+5:302021-04-08T04:14:30+5:30
अमरावती: एका युवकाने विनापरवानगी कोविड रूग्णालयात जावून डॉक्टर व कर्मचाऱ्याशी वाद घातला त्यानंतर धिंगाणा घालून डॉक्टर व उपस्थित ...
अमरावती: एका युवकाने विनापरवानगी कोविड रूग्णालयात जावून डॉक्टर व कर्मचाऱ्याशी वाद घातला त्यानंतर धिंगाणा घालून डॉक्टर व उपस्थित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कोविड(सुपरस्पेशालिटी) हॉस्पिटलमध्ये घडली.
कैलाश उर्फ लखन बाबाराव सोनोने (२१ रा. संजयगांधी नगर जवळ लुबींनीनगर) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी डॉक्टर रविनाथ भुषण (४०, रा. अमरावती) यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गाडगेनगर पोलिसानी भादविची कलम ३५३,३३२ व इतर कल्मानव्ये गुन्हा नोंदविला.
पोलीससुत्रानुसार, सदर आरोपीचा नातेवाईक कोरोना पाॅझिटिव्ह असल्याने ते कोविड रूग्णालयात उपचार घेत आहेत. सदर युवक सकाळी ११ वाजताच सुमारास कोविड रुग्णालयात दाखल होवून येथील प्रतिबंधीतक्षेत्रात प्रवेश केला. ही बाब इतर कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला जाण्यास मनाई करून हटकले. तसेच ही माहिती येथील इनचार्ज डॉक्टर रविनाथ भुषण यांना दिली. ते सुद्धा तेथे आले. त्यांनी त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने न ऐकता शिवीगाळ करुन डॉक्टर व इतर कर्मचाऱ्याला मारहाण केली. व धिंगाणा घातला. त्यामुळे येथे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. कोविड प्रशासनाने ही माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली. ते तातडीने दाखल होवून युवकाला ताब्यात घेतले. मारहाण करणे व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
कोट
कोविड रूग्णालयातील प्रतिबंधीत क्षेत्रात जावून डॉक्टर व कर्मचार्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. त्यावरून गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सुरु आहे.
आसाराम चोरमले वरीष्ठ पोलीस निरीक्षक गाडगेनगर