गुटखाबंदीला मुख्यालयाचा ‘खो’

By admin | Published: November 30, 2015 12:29 AM2015-11-30T00:29:58+5:302015-11-30T00:29:58+5:30

शहराच्या विविध भागांत गुटख्याची बिनबोभाट विक्री होत असल्याचा आरोप होत असताना गुटखाबंदीला अमरावती मुख्यालयानेच ‘खो’ दिल्याची वस्तुस्थिती उघड झाली आहे.

Gokhkabadi headquarters 'lost' | गुटखाबंदीला मुख्यालयाचा ‘खो’

गुटखाबंदीला मुख्यालयाचा ‘खो’

Next

अमरावती : शहराच्या विविध भागांत गुटख्याची बिनबोभाट विक्री होत असल्याचा आरोप होत असताना गुटखाबंदीला अमरावती मुख्यालयानेच ‘खो’ दिल्याची वस्तुस्थिती उघड झाली आहे. गुटखाबंदी निर्णयाची पुरेपूर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासनाची आहे. या विभागच्या जवादे कम्पाऊंडमधील कार्यालयातून पाच जिल्ह्याचा कारभार चालतो. सर्व उच्चपदस्थ अधिकारी अमरावती मुख्यालयी बसतात. विभागातील इतर चार जिल्ह्यांच्या तुलनेत अमरावती जिल्हामध्ये कारवाई दरम्यान जप्त केलेल्या गुटख्याची किंमत सर्वात कमी आहे. त्यामुळे अमरावती मुख्यालयात काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गुटखाबंदीचा कायद्याची अंमलबजावणी कागदावर ठेवल्याचे दिसूद येत आहे.
शहरात तर प्रत्येक पानटपरीवर नाव घेतल्याबरोबर हवी असलेली गुटखापुडी उपलब्ध आहे. केवळ सरसरतच नव्हे तर जिल्ह्यात सर्वदूर हीच परिस्थती आहे. फरक पडला आहे तो फक्त किंमतीचा गुटखाबंदी असल्याने हा गुटखा फक्त बाजारात चढ्या दराने विकल्या जातो. जर पानटपरीनिहाय गुटखापुडींची विक्री होत असेल तर प्रत्येक पानटपरीवर तो माल पोहचविला जात असेल. अर्थात शहरातच गुटखाचा मोठा साठा असल्याचे वास्तव आहे. तथापि गेल्या वर्षभरात अन्न व औषधी प्रशासन गुटखा तस्करांवर ‘जरब’ बसविण्यात अपयस्वी ठरले आहे. अमरावती येथील अन्न व औषधी प्रशासन विभागाशी अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा आणि यवतमाळ हे पांच जिल्हे जोडले आहेत. त्यातल्या, त्यात अमरावती शहर आणि जिल्ह्याचे कार्यक्षेत्र अधिक असल्याने गुटखाविक्रीचे प्रमाण अधिक आहे. मात्र त्यातुलनेत विभागातील इतर जिल्ह्यातील जप्तीचे प्रमाण अमरावतीपेक्षा कितीतरी परीने अधिक आहे.
मध्यंतरी तर गुटखा तस्करांवर अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप विविध सामाजिक संघटनाची केला होता. त्याबाबत अन्न व पुरवठा मंत्र्याकडे तक्रार सुद्धा करण्यात आली होती. गुटखाबंदी असताना अगदी सहजतेने कुठला गुटखा सहज प्रकारे उपलब्ध होत असल्याने अन्न व औषधी प्रशासन टिकेच्या सदस्यस्थानी असते. त्यातच इतर जिल्ह्यातील जप्तीचे प्रमाण अमरावतीपेक्षा अधिक असल्याने अमरावती मुख्यालयी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरातील रामपुरी कॅम्प, मसानगंज, बडनेरा, दहिसाथ या भागातून हजारोंरुपयांचा गुटखासाठा वर्षाच्या पुर्वार्याला जप्त करण्यात आला. तथापि त्यानंतरही शहराच्या कानाकोपऱ्यात सर्रास मिळणारा गुटखा या विभागावर संशयाची सुई दर्शविणारा आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gokhkabadi headquarters 'lost'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.