वनसंपत्तीचे संरक्षण, संवर्धनासाठी सुवर्ण- रजत पदकांची लयलुट

By गणेश वासनिक | Published: December 11, 2022 05:09 PM2022-12-11T17:09:56+5:302022-12-11T17:09:56+5:30

वनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धनाचे प्रभावी कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोधेर्य वाढविणे तसेच त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहित करण्यासाठी राज्य शासनाने गत दोन वर्षापूर्वी पदके देण्याची योजना आरंभली आहे. 

Gold and Silver Medals for Conservation, Conservation of Forest Resources | वनसंपत्तीचे संरक्षण, संवर्धनासाठी सुवर्ण- रजत पदकांची लयलुट

वनसंपत्तीचे संरक्षण, संवर्धनासाठी सुवर्ण- रजत पदकांची लयलुट

googlenewsNext

अमरावती :

वनसंपत्तीचे संरक्षण आणि संवर्धनाचे प्रभावी कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोधेर्य वाढविणे तसेच त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रोत्साहित करण्यासाठी राज्य शासनाने गत दोन वर्षापूर्वी पदके देण्याची योजना आरंभली आहे. 

त्यानुसार सन २०१९-२०२० या वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहा कार्यप्रकारासाठी २३ जणांना सुवर्ण, रजत पदके  जाहीर करण्यात आली आहे. 
यात वन, वन्यजीव संरक्षणार्थ वनरक्षक संवर्गातून रूपी मडावी (गडचिरोली), राजू शिंदे (यवतमाळ) यांना सुवर्ण तर विनोद लबडे (ठाणे), प्रज्ञा खरात (औरंगाबाद), सावळा कांबळे (काेल्हापूर) हे रजत पदकाचे मानकरी ठरले. वनपाल संवर्गातून सुजय कोळी (ठाणे), अभिजीत ठाकरे (अमरावती) यांना सुवर्ण, तर शशिकांत मडके (पुणे) यांना रजत पदक जाहीर झाले. वनक्षेत्रपाल संवर्गातून सागर बनसोड (नागपूर) सुवर्ण, सहाय्यक वनसंरक्षक व्यकंट गायकवाड (औरंगाबाद) यांना मरणोत्तर रजत पदकाने सन्मानित केले जाणार आहे. वन आणि वन्यजीव व्यवस्थापन कार्य प्रकारात वनरक्षक युवराज मराठे (ठाणे) सुवर्ण, प्रदीप गदळे (नागपूर) रजत, तर वनपाल संवर्गातून प्रभाकर आनकरी (गडचिरोली) वनपाल, वनक्षेत्रपाल संवर्गातून 
संतोष थिपे (चंद्रपूर) सुवर्ण आणि सहाय्यक वनसंरक्षक संवर्गातून बापू येळे (चंद्रपूर) यांना रजत पदक बहाल केले जाईल.

नाविण्यपूर्ण, विकासात्मक पूरक कार्य प्रकारात एसीएफ संवर्गातून संजय कडू, वनमजूर संवर्गातून निजाम मुलाणी (पुणे) यांना 
रजत पदक तसेच धाडसी, शौर्य, प्रगती विशिष्ट कार्य प्रकारात वनमजूर संवर्गात धोंडीबा कोकणे (पुणे) सुवर्ण, वाहन स्वच्छक अनिल शेळके (नागपूर) यांना रजत पदक बहाल केले जाणार आहे .

वनउत्पादन कार्य प्रकारात महाराष्ट्र वन विकास महामंडळ अधिकारी, कर्मचारी संवर्गातून प्रितीश लोणारे (चंद्रपूर बल्लारशाह) सुवर्ण तर, अमोल चव्हाण (मार्खंडा)हे रजत पदकाने सन्मानित केले जातील. वन विस्तार कार्य प्रकारात वनरक्षक संवर्गातून रूपाली राऊत (अमरावती) यांना सुवर्ण तर, वनक्षेत्रपाल संवर्गातून उत्तम पाटील (ठाणे) यांना रजत पदकाने गौरविले जाणार आहे. वनसेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे गाेपनीय अहवाल, सचोटी, चारित्र्य, तांत्रिक कार्यक्षमता, बुद्धीमत्ता आणि त्यांनी विकसित केलेले तंत्रज्ञान आदींचा विचार करून सुवर्ण, रजत पदकांसाठी निवड केली आहे. प्रधान वनसचिवांच्या अध्यक्षतेत समितीची २३ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीत पदकांसाठी नावे निश्चित केली आहे.

Web Title: Gold and Silver Medals for Conservation, Conservation of Forest Resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.