विद्यापीठात सुवर्ण पदके काऊंटरवर नव्हे तर प्रत्यक्ष वितरण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:14 AM2021-07-31T04:14:24+5:302021-07-31T04:14:24+5:30
कॉमन अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आता सुवर्ण पदके, पारितोषिके काऊंटरवर नव्हे तर प्रत्यक्ष वितरित करण्यात येणार आहे. ...
कॉमन
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आता सुवर्ण पदके, पारितोषिके काऊंटरवर नव्हे तर प्रत्यक्ष वितरित करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी निर्णय जाहीर केला. आता ३१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता डॉ. के.जी. देशमुख स्मृती सभागृहात गुणवंतांना पदकांचे प्रत्यक्ष वितरण होणार आहे.
विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा २९ मे २०२१ रोजी आभासी पद्धतीने संपन्न झाला. या समारंभात गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक, रौप्यपदक व राेख पारितोषिके देऊन आभासी पद्धतीने सत्कार करण्यात आला. मात्र, विद्यापीठाने प्रत्यक्ष पदके, रोख पारितोषिके हे गुणवंतांना काऊंटरवर मिळतील, असा निर्णय झाला होता. त्यानुसार तयारीदेखील करण्यात आली. तथापि, गुणवंतांना अशा प्रकारे पदके, पारितोषिके वितरण करणे ही बाब अन्याय करणारी असल्याची चौफेर टीका शिक्षण क्षेत्रातून उमटली. दरम्यान ‘लोकमत’नेसुद्धा कुलसचिव तुषार देशमुख यांच्याशी पदके, पारितोषिके वितरणाबाबत विचारणा केली असता ‘ना सोहळा, ना कौतुक’ केवळ काऊंटरवर पदवी वितरण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, शुक्रवारी उशिरा सायंकाळी विद्यापीठाने गुणवंतांना काऊंटरवर पदवी, पारितोषिके वितरण करण्यात येतील, असे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. त्यामुळे विद्यापीठाला उशिरा का होईना शहाणपण सुचल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात जोरदार रंगली आहे.