सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर, १० ग्रॅमसाठी मोजा ६० हजार रुपये

By प्रदीप भाकरे | Published: March 23, 2023 01:50 PM2023-03-23T13:50:13+5:302023-03-23T13:51:56+5:30

चांदीही वधारली : मार्चअखेर ६५ हजारांवर जाण्याची शक्यता

Gold prices at high level, 60 thousand rupees for 10 grams, silver also increased | सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर, १० ग्रॅमसाठी मोजा ६० हजार रुपये

सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर, १० ग्रॅमसाठी मोजा ६० हजार रुपये

googlenewsNext

अमरावती : सोन्याच्या भावाने चार दिवसांपुर्वी २० मार्च रोजी कोरोनापश्चात काळातील आजवरच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला. अमरावतीच्या सराफा बाजारात १० ग्रॅमसाठी सोन्याचा भाव ६० हजार रुपयांवर गेला होता. गुरूवारी त्यात एक हजारांची घट झाली असून, तो दर ५९ हजारांवर स्थिरावला आहे. तत्पूर्वी, २ फेब्रुवारीला सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्या वेळी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी ५८,८०० रुपयांवर गेला होता. 

तज्ज्ञानुसार, शेअर बाजारातील चढउतारांमुळे सोन्याचे भाव वधारत आहेत. त्यामुळे चालू वर्षाच्या अखेरीस सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी ६५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे. मात्र, बाजारात तेजी टिकून आहे. दरम्यान, आता नव्या नियमांनुसार, येत्या एक एप्रिलपासून सहा अंकी ‘हॉलमार्किंग’ शिवाय सोन्याची विक्री करता येणार नाही. ज्याप्रमाणे आधार कार्डवर १२ अंकी क्रमांक असतो, त्याचप्रमाणे सोन्यावर सहा अंकी ‘हॉलमार्क कोड’ असणार आहे. त्याला ‘हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन क्रमांक’ अर्थात ‘एचयूडी’ असे संबोधले जाते. हा क्रमांक उदाहरणार्थ ‘एझे४५२४’ असा असणार आहे. या क्रमांकाच्या मदतीने सोने नेमके किती कॅरेट आहे, हे समजणे सोपे जाणार आहे.

असे आहेत दर सोने २४ कॅरेट : ५९०००
सोने २२ कॅरेट : ५७५००
सोने २० कॅरेट : ५७०००
चांदी : ६९० ००० रुपये प्रति किलो

२० रोजी ६० हजारांवर पोहोचले होते सोने

अमरावतीच्या सराफा बाजारात गुरूवारी सोने प्रति तोळा ५९ हजार रुपये असले तरी, २० मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचा रेट राऊंडफिगर ६० हजार रुपये असा होता. त्यापुर्वी तो ५९ हजार ५०० रुपयांच्या घरात होता. १६ मार्च रोजी २४ कॅरेटसाठी प्रति दहाग्रॅमला ५७ हजार ८०० रुपये मोजावे लागले.

२३ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचा प्रतितोळा दर ५९ हजार रुपये असा होता. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ५७ हजार ५०० रुपये होते. आगामी काळात देखील सोन्याची दरात वृध्दीच संभवते.

- महेश वर्मा, सराफा व्यावसायिक, अमरावती

सोन्याचा भाव वाढण्याची कारणे

  • जागतिक शेअर बाजारांमधील मोठ्या प्रमाणातील चढउतार.
  • चालू वर्षात जगभर मंदी येण्याची शक्यता.
  • डॉलर इंडेक्समध्ये झालेली घसरण.
  • जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून होणारी सोन्याची खरेदी.
  • जगभरात वाढती महागाई.


चांदी ६९,००० वर

चांदीच्या किमतीनेही ६९,००० रुपयांची पातळी पार केली आहे. सराफा बाजारात गुरूवारी चांदीचा भाव प्रति किलोसाठी ६९००० रुपयांवर पोहोचला. तत्पूर्वी, १७ मार्चला चांदीचा भाव प्रति किलोसाठी ६६००० रुपयांवर गेला होता.

Web Title: Gold prices at high level, 60 thousand rupees for 10 grams, silver also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.